खुनी हल्ला करणारा व एक गुन्ह्यांतील फरार आरोपीस जरीपटका पोलिसांना घेतले ताब्यात…
जिवे मारण्याचा प्रयत्न करणारा व अन्य गुन्ह्यांत फरार आरोपीस पाचपावली पोलिसांनी घेतले ताब्यात….
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १६.०२.२०२४ चे १७.०० वा. चे सुमारास, फिर्यादी संजय उर्फ गोलू गजानन सिन्हा, वय ३१ वर्षे,रा. नाईक तलाव, बांग्लादेश, मराठा चौक, पाचपावली, नागपुर हे त्यांचे मित्राला कोर्टाचे तारखेवर भेटायला गेले होते तेथुन परत जातांना ईतर मित्रासह पोलिस ठाणे सदर हद्दीत, व्हीसिए स्टेडियम समोरील डॉली चाय टपरी समोर, उभेअसता आरोपी क्र. १) मंगेश उर्फ मंग्या सुरेश चिरूडकर वय २० वर्ष रा. कांजी हाऊस चौक, इंदीरामाता नगर,यशोधरानगर, नागपूर २) अभिषेक उर्फ घोडा गणेश गांगलवार वय २० वर्ष रा. बाळाभाऊ पेठ नाग मंदीर जवळ,पाचपावली, नागपूर यांनी त्याचे ईतर साथीदारासह संगणमत करून फिर्यादी यांना शिवीगाळ करून हातबुक्कीने मारहाण केली तसेच फिर्यादीचे पायाचे मागील बाजुस मांडीवर गुप्ती सारखे शस्त्राने मारून जखमी केले. फिर्यादीचा उपचार मेयो हॉस्पीटल येथे करण्यात आला होता. अशा फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे सदर येथे आरोपींविरूध्द
कलम ३२६, ५०४, ३४ भा.द.वि., अन्वये गुन्हा दाखल करून त्यांनी आरोपी क्र. १ व २ यांना अटक केली होती. व पाहिजे आरोपी साथीदारांचा शोध सुरू होता.
सदर गुन्हयाच्या तपासादरम्यान, पोलिस ठाणे पाचपावली चे अधिकारी व अंमलदार यांनी गोपनीय माहितीवरून व तांत्रिक तपास करून, वर नमुद गुन्हयातील पाहिजे आरोपी हे पोलिस ठाणे पाचपावली हद्दीत राहणारे आरोपी नामे १) हर्ष उर्फ पिंडा सदानंद आनंदपवार, वय २० वर्षे, रा. मराठा चौक, नाईक तलाव, पोलीस ठाणे पाचपावली, नागपूर २) विवेक उर्फ विक्की उर्फ छोटा आऊ रमेश वाघाडे, वय २३ वर्षे, रा. तांडापेठ, मोचीपूरा,नागपूर यांना ताब्यात घेवुन विचारापुस केली असता, त्यांनी वर नमूद गुन्हा केल्याचे कबुल केले. सदर गुन्हा हा पोलिस ठाणे सदर येथील असल्याने पुढील कारवाई करीता दोन्ही आरोपींना पोलिस ठाणे
सदर यांचे ताब्यात देण्यात आले.
सदर कामगिरी पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे,पोलिस उपायुक्त परीमंडळ ३ गोरख भामरे सहाय्यक पोलिस आयुक्त श्वेता खाडे यांचे मार्गदर्शनाखाली,वपोनि बाबुराव राऊत, सपोनि प्रविण सोमवंशी, पोहवा ज्ञानेश्वर भोगे, छगन,नापोशि रमेश मेनेवार, ईमरान शेख, पोशि गगन यादव, संतोष शेंद्रे,राहुल चिकटे, महेन्द्र सेलोकर यांनी केली.