
सहाय्यक पोलिस अधिक्षक यांचे पथकाचा कळमेश्वर हद्दीतील जुगारावर छापा,१५ आरोपींसह लाखोंचा मुद्देमाल जप्त…
सहाय्यक पोलिस अधिक्षक यांचे आदेशानुसार केळवद पोलिसांनी टाकला जुगार अड्डयावर छापा,15 आरोपींसह 34.77,300 ₹ चा मुदेमाल केला जप्त….
कळमेश्वर (नागपुर)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 6 रोजी शांतीवन चिचोली शिवरातील फेटरी ते खडगाव रोडवरील शेतात खुल्या शेडमध्ये चालणाऱ्या जुगार अड्डयाबाबत दि. 06/02/2024 रोजी अनिल म्हस्के (भा. पो.से.) सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर विभाग सावनेर यांना मिळाली त्यानुसार त्यांनी सदरची माहीती प्रभारी पोलिस स्टेशन केळवद सपोनि राकेश साखरकर यांना सदर जुगार अड्डयावर कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले होते त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश साखरकर पोउपनि दोनोडे, परि पोउपनि गेडाम, तसेच सोबत पो.स्टे. केळवद व तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय सावनेर येथिल स्टॉफ व आर. सी. पी. पथकास पो.स्टे. केळवद येथे बोलावुन त्यांना योग्य सुचना देवुन खाजगी वाहनांनी जुगारी ईसमांवर छापा टाकण्यासाठी पाठविले असता मौजा शांतीवन चिचोली परिसरात फेटरी ते खडगाव रोडवर पार्थ प्रिकास्ट कंपनीचे जवळील झाडीझुडनीचे बाजुला असलेल्या शेतात काही ईसम पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळ
एका शेतात खुल्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक लाईटचे उजेडात काही ईसम पैशाचे हारजीतचा जुगार खेळ खेळतांना दिसुन आल्याने पोलिस स्टाफने सिनेस्टाईल पध्दतीने घेराव घालुन लपतछपत जावुन छापा टाकला असता पोलिसांना पाहुन काही जुगारी ईसम अंधाराचा फायदा घेत पळुन गेले. घटनास्थळी


1) गणेश आनंदराव चाचेकर वय 49 वर्ष रा. गोरेवाडा पुरानी वस्ती नागपुर

2) आकाश सुभाष खंडाते वय 26 वर्ष रा. हिंदी नगर सरोज शाळेजवळ नागपुर

3) प्रशांत दशरथ मस्के वय 40 वर्ष रा. जयताळा माउली मंदीर जवळ नागपुर
4) अमीत विजय मेश्राम वय 34 वर्ष रा. इंदोरा बौध्द विहाराजवळ
नागपुर
5) राजेश एकनाथ पुणेकर वय 49 वर्ष रा. गोलीबार चौक कोसारकर मोहल्ला नागपुर
6) सुनिल गम्मु पटेल वय 42 वर्ष रा. गोरेवाडा पुरानी वस्ती नागपुर 7) सुधिर भाउराव धुमाळे वय 36 वर्ष रा. गोरेवाडा पुरानी वस्ती नागपुर
8) आनंद देवशंकर वर्मा वय 30 वर्ष रा. फेटरी वार्ड क्र. 01 ता. कळमेश्वर
9) ऋषभ सुरेश राउत वय 27 वर्ष रा. हुडको कॉलनी वार्ड क्र. 14 कळमेश्वर
10) राकेश दशरथ येलेकर वय 23 वर्ष रा. बोंडाळा लावा वाडी रोड वार्ड क्र. 3 नागपुर
11 ) सुधाकर धोंडबाजी घनचक्कर वय 70 वर्ष रा. हिंगणा
तहसिल कार्यालयासमोर वार्ड क्र. 06 नागपुर
12 ) वसिम अक्तर खान वय 35 वर्ष रा. कोराडी हनुमान मंदीर
जवळ वार्ड क्र. 02 नागपुर
13) संजय विष्णु धोतरे वय 49 वर्ष रा. संजय नगर एन.आय.टी. कॉलेजजवळ नागपुर
14) अमोल मनोहर बावणे वय 32 वर्ष रा. व्याहाड चौदामैल कळमेश्वर
15 ) मयुर सुधिर मेश्राम वय 27 वर्ष रा. रमाबाई आंबेडकर नगर जयताळा नागपुर हे जुगारी ईसम मिळुन आले त्यांचे ताब्यातुन एकुण नगदी 53300/- रू. व वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल तसेच आरोपींच्या घटनास्थळावरील तीन चारचाकी व अकरा दुचारी वाहने असा एकुण 34,77,300 /- रू. चा मुद्देमाल जप्त करून त्यांचेविरूध्द पो.स्टे. कळमेश्वर येथे अपराध क्र. 68/2024 कलम 12 म.जु.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरू आहे.
सदरची धडाकेबाज कार्यवाही हर्ष पोद्दार (भा.पो.से.) पोलिस अधिक्षक नागपुर ग्रामीण, रमेश धुमाळ अपर पोलिस अधिक्षक नागपुर ग्रामीण, अनिल म्हस्के (भा.पो.से.) सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर विभाग सावनेर यांचे मार्गदर्शनात सपोनि राकेश साखरकर पो.स्टे. केळवद, पोउपनि व्यकटेश दोनोडे, परि. पोउपनि स्वप्नील गेडाम, पोहवा सुधिर यादगिरे, पोहवा दिनेश काकडे, पोशि नितेश पुसाम, पोशि धोंडुतात्या देवकते, पोशि पंकज कोहाड, पोशि गणेश उईके, सफौ. मन्नान नौरंगाबादे, पोहवा पंकज गाडगे, पोहवा रवी बांबल, पोशि श्रिकांत पात्रे तसेच आर.सी.पी. पथकातील अंमलदार यांनी केलेली
आहे.


