अवैधरित्या विनापरवाणा वाळुची वाहतुक करणाऱ्यावर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाची कार्यवाही…
अवैधपणे वाळुची( रेतीची) चोरटी वाहतुक करणाऱ्या विरुध्द पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाची कार्यवाही,वाहनासह एकुण ७०८५०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त केला जप्त…
नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १७/०२/२०२४ चे ०३.०० वा. ते ०३.३० वा. दरम्यान पोलिस अधिक्षक यांचे विशेष पथकातील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की पवनी येथून नीलज मार्गे टिप्पर ट्रक वाहनामध्ये अवैद्यरीत्या विनापरवाना रेती (वाळु) लोड करून भिवापुर उमरेड मार्गे नागपूर जाणार आहे. अशा खात्रीशीर बातमी वरून मौजा भिवापूर बस स्टॉप येथे नाकाबंदी करीत असताना एक बारा चक्का टिप्पर MH 40 CM 9762 व त्याच्या मागे दहा चक्का टिप्पर क्र. MH 40CT 5239 एकामागे एक आढळुन आल्या. स्टाफने वाहनांना थांबवून
पाहणी केली असता दोन्ही वाहनामध्ये अंदाजे १७ ब्रास रेती(वाळु) ब्रास रेती (वाळु)मिळून आल्याने सदर ट्रक चालकास ट्रक मधील रेतीचे (वाळु) रॉयल्टी बाबत विचारले असता रॉयल्टी नसल्याचे सांगितल्याने व सदरची रेती (वाळु) ही चोरीची असल्याची खात्री झाल्याने आरोपींच्या ताब्यातून एक पांढरा व निळया रंगाचा टाटा कंपनीचा टिप्पर ट्रक क्र. MH 40 CM 9762 किंमती ४०,००००० /- रू. मध्ये १० ब्रास रेती किंमती ५०००० /- रू. २) एक पांढरा व नीळसर रंगाचा अशोक लेलँड दहा चक्का टिप्पर क्र. MH 40 CT 5239 किंमती ३०,००००० / – रू. मध्ये ०७ ब्रास रेती किंमती ३५००० / – रू. असा एकुण ७०८५०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी नामे –
१) निलेश ईश्वर उइके, या ३६ वर्ष रा. उंदरी सूरगाव उमरेड नागपूर जि. नागपुर
२) अभिषेक निरंजन शेंडे, वय ३५ वर्ष रा. आंबेडकर नगर कुंजीलाल पेठ नागपूर
हे पाहीजे आरोपी मालक नामे –
३) संघपाल मेश्राम, रा. ह. मु. बहादुरा दिघोरी नागपूर ४) अरविंद लक्ष्मण फलके, रा. कुही रोड डोंगरगाव
यांचे सांगणे प्रमाणे विनापरवाना रेती चोरी करून वाहतूक करताना मिळून आले. असे एकुण ०४ आरोपी यांचेविरुद्ध पोस्टे भिवापूर येथे अप क्र. ६५ / २०२४ कलम ३७९, १०९, ३४ भा.द.वी. सहकलम ४८ (७),४८(८) महाराष्ट्र जमिन महसूल संहिता, सहकलम २१, ०४ खाणी आणि खनिजे अधिनियम १९५७ सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधि. १९८४ अन्वये पो. स्टे. भिवापूर येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार,अपर पोलिस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमीत पांडे, पोलिस हवा ललीत उईके, नापोशि प्रणय बनाफर, पोशि कार्तिक पुरी, बालाजी बारगुले, शुभम मोरोकार विशेष पथक नागपूर ग्रामीण यांनी केली.