
कळमेश्वर हद्दीत बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या २ हुक्का पार्लरवर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाचा छापा…
पोलिस स्टेशन,कळमेश्वर हद्दीत अवैधरित्या चालणार्या हुक्का पार्लरवर पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाची धाड….
नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांना नागपुर ग्रामीण परीसरात बरेच अवैध धंदे बेकायदेशीर रित्या चालतात व त्यांच्यावर पोलिस कार्यवाही सुध्दा करतात परंतु येरे माझ्या मागल्या या म्हनीप्रमाणे जैसे थे परिस्थिती सुरु होते त्याला निर्बंध घालण्यासाठी पोलिस अधिक्षकांनी विशेष पथकाची स्थापना केली
त्याअनुषंगाने दि.(२८) चे रात्री १०.५० ते ११.३० वा. चे दरम्यान पोलिस अधिक्षक यांचे विशेष पथकास गोपनीय सुत्राद्वारे माहिती मिळाली की, पोलिस स्टेशन कळमेश्वर हद्दीत २० किमी अंतरावर मौजा गोंडखैरी हिंगणा टि-पॉईंट येथे बेकायदेशीररीत्या हुक्का पार्लर सुरू आहे, अशा मिळालेल्या माहिती वरून विशेष पथकाने अॅटमॉस्पीअर रेस्टॉरंन्ट येथे छापा टाकला असता यातील रेस्टॉरंन्ट मालक राजा खान यांनी मॅनेजर व वेटर यांचे मदतीने बेकायदेशिररित्या रेस्टॉरन्ट / हुक्का पार्लर सुरू ठेवुन हॉटेल मधील लोकांना हुक्का पिण्यासाठी उपलब्ध करून दिल्याने तसेच


१ ) हॉटेल अॅटमॉस्पीअर मॅनेजर संघदीप मोरेश्वर मेश्राम वय ४१ वर्ष रा. भिवसनखोरी ढाबा नागपुर,

२) हॉटेल ॲटमॉस्पीअर वेटर आकाश कोमल चव्हाण वय २८ वर्ष रा. खैरी पन्नासे हिंगणा नागपुर,

३)हॉटेल ॲटमॉस्पीअर मालक मोहम्मद असलम उर्फ राजा अस्फाक खान वय ४८ वर्ष रा. बोरगाव दिनशा फॅक्टरीजवळ गिटटीखदान नागपुर
यांना ताब्यात घेवुन त्यांचेविरूद्ध कलम ४ अ, २१ अ सिगारेट आणि इतर तंबाखु उत्पादने ( जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन) अधिनियम, २००३ गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तसेच मौजा गोंडखैरी हिंगणा टि-पॉईंट येथील वंडर्स ऑफ वर्ल्ड रेस्टॉरन्ट येथेही छापा टाकला असता यातील रेस्टॉरंन्ट मालक वासवानी यांनी मॅनेजर व वेटर यांचे मदतीने बेकायदेशिररित्या रेस्टॉरन्ट / हुक्का पार्लर सुरू ठेवुन हॉटेल मधील लोकांना हुक्का पिण्यासाठी उपलब्ध करून दिल्याने आरोपी हॉटेल वंडर्स ऑफ वर्ल्ड मॅनेजर
१)संकेत दिवाकर जिवतोडे वय ३१ वर्ष रा. तिष्टी ता. कळमेश्वर,
२) हॉटेल वंडर्स ऑफ वर्ल्ड वेटर हर्ष किशोर सोमकुंवर वय १९ वर्ष
रा हिलटॉप पांढराबोडी नागपुर,
३) हॉटेल वंडर्स ऑफ वर्ल्ड मालक हितेश हरिश वासवानी वय ४० वर्ष रा गांधी बाग अग्रसेन चौक नागपुर
यांचेविरूद्ध पोस्टे कळमेश्वर येथे कलम ४अ, २१अ सिगारेट आणि इतर तंबाखु उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन) अधिनियम २००३ गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार, अपर पोलिस अधीक्षक.,जमा संदिप पखाले यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सपोनि अमित पांडे, पोउपनि देविदास ठमके,
पोहवा हरीदास चाचरकर, ललीत उईके, पोलीस नायक प्रणय बनाफर, कार्तिक पुरी, बालाजी बोरगुले, अतुल बांते, शुभम मोरोकार यांनी केली.


