
लग्नाचे आमिष दाखवुन युवतीचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या,पिडीतेची आपबिती ऐकुन पोलिसही झाले थक्क…
नागपूर(प्रतिनिधी) – ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवुन प्रेयसीचे लैंगिक शोषण केले.
त्यानंतर तिच्या आईच्या बँक खात्यातून परस्पर कर्ज घेतल्याचे समोर आले आहे. हा प्रकार उघडकीस येताच प्रेयसीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून प्रियकराला अटक केली.
प्रफुल्ल रामचंद्र बले असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडिताच्या आईला कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी पीडिता तरुणीची आरोपी प्रफुल्लसोबत ओळख झाली. जेव्हा तिला एकमेकांना मदत केल्यानंतर त्यांनी मोबाईल नंबर आपापसात बदलले. यानंतर दोघांची मैत्री झाली. काही दिवस ते एकमेकांच्या संपर्कात होते. दरम्यान तरुणीच्या आईचे निधन झाले. ती एकटी पडल्यावर प्रफुल्लने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तिचे सांत्वन करण्यासाठी तो नेहमी तिच्या घरी यायचा. यानंतर त्यांच्यात जवळीक वाढली. त्याने तिलाप्रेमाच्या जाळ्यात अडकवले.
आरोपी प्रफुलने तिला लग्नाचे आमिष दाखवून त्याने लिव्ह इनमध्ये राहण्यास भाग पाडले. १४ एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान त्याने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. तरूणीच्या आई-वडिलांच्या मृत्युमुळे आरोपी तिच्या घरी राहायला आला. दोघांमध्ये काही दिवस चांगले गेले. दरम्यान, प्रफुल्लला जुगाराचे व्यसन जडले. या काळात त्याने तरुणीच्या आईचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड वापरून विविध कर्ज अॅपवरून दोन लाखांपेक्षा जास्त रुपयांचे कर्ज घेतले.काही महिन्यांनी बँकेकडून कर्ज फेडण्याची नोटीस आली. त्यामुळे नेहाला आश्चर्य वाटले. मृत आई कर्ज कसे घेऊ
शकते, असा प्रश्न तिने बँकेच्या अधिकाऱ्यांना विचारला असता संपूर्ण सत्य बाहेर आले. तरुणीने प्रफुलला कर्जाची रक्कम भरण्यास सांगितल्यावर प्रफुलने नकार दिला. यामुळे संतापलेल्या तरुणीने पाचपावली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करून प्रफुल्ल बले याला अटक केली.
.




