
चोरलेला महागडा मोबाईल अवघ्या २ तासात शोधून काढण्यात अकोला रेल्वे पोलीसांना यश….
अकोला(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २८/१२/२०२३ रोजी सकाळी ०७.०० वाजताचे सुमारास अकोला रेल्वे स्टेशन येथील बुकिंग ऑफिसमधून फिर्यादी सचिन गुंडेवार रा. हिंगोली यांचे खिश्यातील दिड लाख रूपये किंमतीचा मोबाईल त्यांची नजर चुकवून कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेला होता. सदरबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अकोला रेल्वे पोलिस स्टेशन येथे गु.र.नं. ५४७ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याअनुषंगाने
वरीष्ठ पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे प्रभारी अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक अर्चना गाढवे यांनी त्यांच्याकडील अधिकारी व डी. बी. पथकाचे पोलिसांसह सदर गुन्हयाचा तपास चालू
केला. तात्काळ सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले असता त्यामध्ये एक मुलगा फिर्यादी यांच्या खिश्यातील मोबाईल काढताना दिसून आला. मिळालेल्या वर्णनावरून सदर मुलाचा शोध घेतला असता गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या २ तासात तो मुलगा एस. टी. स्टॅण्ड परिसरात मिळून आला. तो झारखंड येथे राहणारा अल्पवयीन मुलगा असून तो झारखंडला निघून जाण्याच्या तयारीत असल्याचे तपासात दिसून आले. त्याच्याकडून फिर्यादी यांचा चोरी करून नेलेला सॅमसंग झेड फोल्ड ३ हा दिड लाख रूपयाचा महागडा मोबाईल हस्तगत करण्यात आला असून फिर्यादी यांना आहे त्या परिस्थितीत परत केलेला आहे. फिर्यादी यांना अपेक्षा नसताना एवढया कमी वेळेमध्ये त्यांचा मोबाईल रेल्वे पोलीसांनी
परत मिळवून दिल्यांनी त्यांनी अकोला रेल्वे पोलिसांचे कौतुक केले आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक डॉ. श्री अक्षय शिंदे ,अप्पर पोलिस अधिक्षक श्रीमती वैशाली शिंदे, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी पांडूरंग सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी
अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक अर्चना गाढवे, पो.उप निरीक्षक चंद्रकांत निकम, राजेश वरठे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो. हवा. संतोष वडगीरे, अविनाश मनस्कार, पो. शि. कपिल गवई, इरफान पठाण, विजय शेगावकर, यांनी केली आहे.


