गॅस कटरने ATM कापुन त्यातील रोकड लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस नागपुर(ग्रामीण) LCB ने केली अटक…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

नागपुर ग्रामीण पोलिस – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २३/०९/२०२३ रोजी रात्री ०२.३० वा. ते ०२.४५ वा. दरम्यान बुट्टीबोरी परीसरातील ICIC बँकेचे ATM मशीन मध्ये काही अनोळखी इसमांनी संगनमत करून प्रवेश केला व  गॅस कटरचा वापर करून ATM मशीनचे समोरील डिस्पेन्सर डोअर व वॉल्ट कापून ATM मशीन मधून एकुण १४,९५,२००/- रू चोरून नेल्याच्या फिर्यादी यांचे रीपोर्ट वरून पोलिस स्टेशन बोरी येथे अप क्र. ७७७/२३ कलम ४५७, ३८०, ३४ भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन  पोलिस अधीक्षक   हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से.) यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा ओमप्रकाश कोकाटे यांचे नेतृत्वात नमुद गुन्हयाचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले. त्यावरून पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी आपल्या अधिपत्याखाली अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथके तयार करून तपासाच्या सुचना दिल्या. सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत असतांना तांत्रिक पद्धतीच्या आधारे नमुद गुन्हयातील संशयित आरोपी हे एका पांढऱ्या रंगाच्या सुझुकी स्विफ्ट या चारचाकी वाहनाने येवुन सदर घटना करून बोरखेडी टोल प्लाझा येथुन TS01EM1515 या क्रमांकाने टोल पास केल्याचे दिसुन आले. सदर वाहन
क्रमांकाचे वाहन पोर्टलवरून डिटेल काढले असता त्यांनी वापरलेला नंबर चुकीचा असल्याचे दिसुन आले. सदर पथकने
महाराष्ट्रातील तेलंगाना येथील टोल प्लाझा चेक करून सदर वाहन आंध्रप्रदेशकडे गेल्याची तांत्रिकरीत्या निष्पन्न करून त्या आधारे नमुद वाहनाचा सतत ८०० किमी पाठलाग करीत पोलिस स्टेशन ढोण जि. नंदीयाल रा. आंध्रप्रदेश परीसरात सापळा रचुन नमुद वाहन थांबविले असता त्यामागे एक कंटेनर संशयितरीत्या थांबुन चारचाकी वाहनातील इसमांना ताब्यात घेत असता कंटेनरमधील ०५ इसमांपैकी ०४ इसम पळुन गेले. पळुन गेलेले ०४ इसमांनी चोरी केलेली रक्कम सोबत घेवुन पळुन गेले. पळुन गेलेल्या चारही इसमांचा शोध स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण करीत आहे. घटनास्थळावर संशयित सुझुकी स्विफ्ट कार मधील ०२ इसम

१) हरेत सिंग रामहंस सिंग वय ३२ वर्ष, रा. खुर्शी पोस्ट जटवारी, ता. छाता जि. मथुरा (उत्तरप्रदेश)





२) वसीम अकरम मोहम्मद आझाद, वय २४ वर्ष, रा. धिमरी
जि. भरतपूर (राजस्थान) तसेच तसेच कंटेनरच्या चालकाने त्याचे नाव मोहम्मद मुस्तकीन आस मोहम्मद, वय २९ वर्ष,
रा. घसेडा ता. नुहु, जि. मेवात (हरीयाणा)



यांना ताब्यात घेतले असता त्यांना पोलिस स्टेशन बुट्टीबोरी अप. क्र.
७७७/२३ कलम ४५७, ३८०, ३४ भादवि गुन्हयाचे घटनेसंबंधाने विचारपुस केली असता त्यांनी पळून गेलेले ०४ इसमांसह नमुद गुन्हा केल्याचे सांगितले. पुढे त्यांचे ताब्यातून सदर गुन्हा करतेवेळी वापरलेले पांढऱ्या रंगाच्या सुझुकी स्विफ्ट कार HR-98 / L4506 तसेच कंटेनर क्र. RJ-14 / GN – 4874 व त्यामधुन एमटीम कापणेकरीता लागणारे ऑक्सीजन सिलेंडर, एल.पी.जी. सिलेंडर व इतर साहीत्य जप्त करून एकुण २७,३०,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. पळुन गेलेल्या आरोपींचा शोध सुरू असुन सदरचा एटीएम गॅस कटरने कापून पैसे चोरी करण्याचा गुन्हा
उघडकीस आणलेला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक नागपूर ग्रामीण . हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से.), अपर पोलिस अधिक्षक नागपूर ग्रामीण  डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक  ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलिस निरीक्षक राजीव कर्मलवार, आशिषसिंग ठाकूर, पोलिस उपनिरीक्षक आशिष मोरखडे, बट्टुलाल पांडे, सहायक फौजदार महेश जाधव, नाना राऊत, पोलिस हवालदार मिलींद नांदुरकर, गजेंद्र चौधरी, राजेंद्र
रेवतकर, आशिष भुरे, इक्बाल शेख, मयुर ढेकले, अरविंद भगत, विनोद काळे, पोलीस नायक रोहन डाखोरे, अमृत किनगे, किशोर वानखेडे, उमेश फुलबेल, नितेश पिपरोदे, विपीन गायधने, पोलिस अंमलदार राकेश तालेवार, चालक आशुतोष लांजेवार, सुमित बांगडे यांनी पार पाडली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!