
दिवसाढवळ्या घरफोडी करणारा अट्टल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या तावडीत…
कुही(नागपुर ग्रामीण)- सवीस्तर व्रुत्त असे की कुही येथे दिवसा ढवळ्या घरफोडीचे गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगारास ₹2,49,567/- चे मुद्देमालासह गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांना यश आले दिनांक २०/०२/२०२३ चे दुपारी २ वा. ते दिनांक २२/०२/२०२३ चे रात्री ८ वा चे . दरम्यान फिर्यादी
दयाराम तुळशीराम भिवगडे, वय ४३ वर्ष, रा. वार्ड नं. ०३, सिल्ली ता. कुही जि. नागपूर यांनी कपाटातील ठेवलेले जुने वापरते सोन्याचांदीचे दागिने व नगदी ३५०० /- रू. असा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात आरोपीने घरात प्रवेश करून चोरून नेले. अशा फिर्यादीच्या रीपोर्ट वरून पो.स्टे. कुही येथे अप. क्र. ४२ / २३ कलम ४५४, ३८०
भादवि अन्वये गुन्हा नोंद आहे.
सदर गुन्हयाचा समांतर तपासात पोलिस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक ०८/०९/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मालमत्तेसंबंधी गुन्हयाचा समांतर तपास संबंधाने फिरत असतांना पोलिस ठाणे कुही अप. क्र. ४२ / २३ कलम ४५४, ३८० भादंवि या गुन्हया संबंधाने अट्टल गुन्हेगार आरोपी -अनिल चुन्नीलाल बोरकर, वय ३७ वर्ष, रा. साकोली जि. भंडारा यास सापळा रचुन ताब्यात घेतले असता विचारपुस दरम्यान त्याने वरील नमुद गुन्हा केल्याचे सांगितले. पुढे अधिक विचारपुस दरम्यान त्याने कुही परिसरातच आणखी एक घरफोडीचा गुन्हा केल्याचे सांगितले. त्यावरून त्याचे व त्याचे साथीदार उषक महेश उरकुडे, वय १९ वर्ष, रा. नंदनवन नागपुर यांचे कडुन दोन्ही गुन्हयातील चोरी केलेले सोन्याचे दागिन्यांचे लगड व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त
करण्यात आले. यातील दोन्ही आरोपीस ताब्यात घेवून त्यांचे कडुन गुन्हयात चोरी केलेले मुद्देमाल जप्त करून खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आणले. उघडकीस आणलेले गुन्हे
१) पोलिस ठाणे कुही ४२ / २३ कलम ४५४, ३८०
भादवि.


२) पोलिस ठाणे कूही १७०/२३ कलम ४५४, ३८० भादवि

असे एकुण ०२ गुन्हे उघडकीस आणले. सदर आरोपीतांना ताब्यात घेवुन आरोपीतांकडुन

१) एकुण ३० ग्रॅम वजनाचे १,६९,५६७ /- रुपये किंमतीचे सोन्याचे दोन लगड
२) गुन्हयात वापरलेली बजाज पल्सर मो. सा. क्र. MH-36 / AH-1507 की. ८०,००० /- रू असा एकुण २,४९,५६७/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीची वैद्यकिय तपासणी करून संबंधित कागदपत्रे व जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर प्रक्रियेकरिता पोलिस ठाणे कूही यांच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही ही पोलिस अधीक्षक नागपूर (ग्रामीण) हर्ष ए. पोद्दार,अपर पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलिस उपनिरीक्षक आशीष मोरखडे, पोलिस हवालदार मिलिंद नांदुरकर, मयूर ढेकळे, अरविंद भगत, पोलिस नायक रोहन डाखोरे, अमृत किनगे, पोलिस अंमलदार राकेश तालेवार, राहूल साबळे, सतिश राठोड चालक आशुतोष लांजेवार यांनी पार पाडली.


