नवीन कायदेप्रणाली संबंधाने कार्यशाळेचे आयोजन..

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

नागपुर ग्रामीण पोलिस दल तसेच स्व गोविंदरावजी वंजारी विधि महाविद्यालयात नवीन कायदेप्रणाली संबंधाने कार्यशाळेचे आयोजन…

भिवापुर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(१) जुलै पासुन देशभरात जुनी कायदेव्यवस्था  कालबाह्य होऊन नवीन भारतीय कायदे प्रणाली लागु होणार आहे त्याअनुषंगाने नागपुर येथे पोलिस अधिक्षक नागपुर ग्रामीन हर्ष पोद्दार यांचे संकल्पनेतुन स्व. गोविंदराव वंजारी विधी महाविद्यालय नागपूर व महाराष्ट्र पोलिस नागपूर ( ग्रामिण ) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८/०६/२०२४ ला एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.





या कार्यशाळेचा विषय नविन फौजदारी कायदे हा होता. त्या १ जुलै २०२४ पासून लागू होणारे तिनही फौजदारी कायदे या विषयावर तज्ञांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन महाराष्ट्र पोलिस नागपूर ( ग्रामिण ) उमरेड विभागाचे उपविभागिय पोलिस अधिकारी राजा पवार हे उपस्थित होते.



या कार्यशाळेमध्ये भारतीय न्याय संहिता 2023 या विषयावर प्राचार्य डॉ. स्नेहल फडणविस यांनी प्रकाश टाकला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या विषयांवर डॉ. लीना लंगडे व भारतीय साक्ष अधिनियम 2023 या कायद्यांवर नागपूर हायकोर्ट चे अधिवक्ता अॅड. अमोल हुंगे यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी विविध बदल झालेल्या कलमांवर चर्चा करण्यात आली.



या कार्यक्रमाचे आयोजन अमर सेवा मंडळच्या अध्यक्ष डॉ. सुहासिनी वंजारी, सचिव व आमदार अॅड. अभिजीत वंजारी व अमर सेवा मंडळाच्या कोषाध्यक्षा व सिनेट सदस्य डॉ. स्मिता वंजारी यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले होते. या प्रसंगी महाराष्ट्र पोलिस (ग्रामिण ) नागपूर चे पोलिस अधिकारी व कर्मचार तसेच विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेचे संचालन प्राध्यापिका डॉ. अर्चना सुके तर आभारप्रदर्शन प्राध्यापिका वैशाली शिवणकर यांनी केले.

सदरची कार्यशाळा आयोजित करण्यासाठी पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ,ठाणेदार पोलिस स्टेशन भिवापुर जयप्रकाश निर्मल तसेच पोलिस स्टेशन भिवापुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!