अट्टल गुन्हेगारास माऊजर व कारतुसह बुटीबोरी पोलिसांनी घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अट्टल गुन्हेगाराकडुन बुट्टीबोरी पोलिसांनी केले माऊजर व ५ जिवंत काडतुस जप्त…

बुटीबोरी(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि.(२४)जुन रोजी पोलिस स्टेशन बुट्टीबोरी येथे गुन्हे प्रगटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार हे वरीष्ठांच्या आदेशाप्रमाणे पोलिस स्टेशन ह्दीत अभिलेखावरील गुन्हेगार व अवैध्य धंदयावर कार्यवाही करण्याकरीता पेट्रोलींग करीत असतांना  मिळालेल्या गोपनीय माहीतीवरून एक संशयीत ईसम नागपुर ते वर्धा जाणा-या रोडवर उभा असुन त्याच्याजवळ माऊजर आहे.





अशा माहीतीवरूण गुन्हे प्रगटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार त्या ठिकाणी पोहोचुन त्याची व त्याच्या ताब्यातील थैलीची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातील थैलीत एक विदेशी बनावटीचे माऊजर किंमत अंदाजे ३००००/- व ५ जिवंत काडतुस किंमत ५०० /- रू. असा एकूण ३०५०० /- रू चा मुद्देमाल मिळून आला या वरून पो.स्टे. ला अप. क्र. ४७५/२४ कलम ३ / २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये सदरचा गुन्हा नोंद असुन तपास सुरु आहे
सदर गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी शुभम उर्फ शेरू अशोक उईके वय २४ वर्ष रा. वार्ड नं २ खापरखेडा बौध्द विहार जवळ ता सावनेर जि नागपुर याचे ताब्यातुन एक विदेशी बनावटीचे माऊजर कि अंदाजे ३०००० /- व ५ जिवंत काडतुस किंमती ५०० /- असा एकुण ३०५०० /- रू चा माल मिळुन आला सदर आरोपी हा अट्टल गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द पो स्टे खापरखेडा येथे खुन खंडणी व अवैध्यरीत्या अग्नीशस्त्र बाळगणे सारख्ये गंभीर गुन्हे दाखल
आहे तसेच हा आरोपी पोस्टे खापरखेडा येथून अवैध्यरीत्या अग्नीशस्त्र बाळगणे या गुन्हयात ०८ दिवसापासुन फरार होता



सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ,उपविभागीय पोलिस अधिकारी,नागपुर पुजा गायकवाड,पोलिस निरीक्षक हृदयनारायण यादव यांचे मार्गदर्शनाखाली गठीत विशेष पथकातील अधिकारी सपोनि प्रशांत लभाणे, पोहवा आशिष टेकाम, युनूस खान, कृणाल पारधी, अरविंद चव्हाण पोशि दशरथ घुगरे, प्रदीप देशमुख यांनी कामगिरी पार पाडली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि प्रशांत लभाने पोस्टे बुट्टीबोरी हे करीत आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!