
रामटेक येथील हायप्रोफाईल जुगार अड्डयावर सावनेर सहा.पोलिस अधिक्षकांचा छापा…
रामटेक हद्दीतील फार्महाउसवर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर सहा.पोलिस अधिक्षक,अनिल मस्के यांचे पथकाचा मध्यरात्री छापा, एकुण १२ जुगारींना अटक, ५ दुचाकी व २ चारचाकींसह एकूण १७,८९,३००/- मुद्देमाल जप्त….
रामटेक(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नागपुर जिल्ह्यातील विशेषतः उपविभागातील अवैध धंदे कार्यवाही संदर्भात पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,सावनेर अनिल म्हस्के यांना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने दिनांक २६.०९.२०२४ रोजी रात्री ०१/१५ वा अनिल म्हस्के यांना गोपनिय बातमीदाराने माहीती दिली आहे कि, आमगाव शिवार तालुका रामटेक जि नागपुर येथे एका फार्महाउस मध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या जुगार सुरू असुन तिथे काही इसम तासपत्त्यावर पैसे लावुन हारजीतचा जुगार खेळत आहे.


मिळालेल्या गोपनीय माहीतीनुसार सहा पोलिस अधिक्षक अनिल म्हस्के यांनी तात्काळ मिळालेल्या माहीतीची शहानिशा करुन सदरची माहीती ही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांना दिल्याने त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सहा पोलिस अधिक्षक अनिल म्हस्के यांनी सावनेर उपविभागातील पोलिस स्टेशन सावनेर, खापा, केळवद येथील पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक तयार करुन सदर पथकासह आमगाव शिवार येथे रवाना केले त्यानुसार किस्मत पान पॅलेस जवळ असलेल्या परीसरामध्ये एका फार्महाउस मध्ये लाईट सुरू असल्याचे व त्याबाहेर मोटर सायकल व चारचाकी वाहने उभी असल्याने नमुद पथकाने तेथे छापा घातला असता काही इसम तासपत्त्यावर पैशाची बाजी लावुन हारजीतचा खेळ खेळतांना मिळुन आले. काहींना जागीच पकडण्यात आले, तरी काही इसम हे पोलिसांना पाहुन पळुन गेले.

यातील आरोपी १) दिनेश रमेश खिचर वय ४४ वर्ष रा आंबेडकर वार्ड रामटेक याला ताब्यात घेवुन पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये ३२०००/- रू रोख व एक नथिंग कंपनीचा मोबाईल तसेच सॅमसंग कंपनीचा मोबाईल मिळुन आला. आरोपी क्र २) हीरालाल सुभाजी गपडपायले वय ६५ वर्ष रा. वार्ड बालाघाट मध्यप्रदेश यांचे ताब्यातुन कि २०५००/- रू रोख, एक रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन मिळुन आला. आरोपी क्र ३) रतिराम शंकर मोटघरे वय २२ वर्ष रा भोरदेव कुही, हमु खरबी नागपूर यांचे जवळुन रोख १५७००/-रू एक आयफोन मोबाइल तर दुसरा विवो कंपनीचा मोबाईल मिळुन आला. आरोपी क्र ४) असलम वल्द सलीम खान वय ५२ वर्ष रा. बालाघाट मध्यप्रदेश यांचे ताब्यातुन २०२००/- रू व एक वन प्लस कंपनीचा मोबाईल मिळून आला. आरोपी क्र ५) दिपक प्रेमलाल पसीने वय ५३ वर्ष रा भंडारा यांचे ताब्यातुन ३०७००/-रू आणि एक नोकीया कंपनीचा मोबाईल मिळुन आला. आरोपी क्र ६) आकाश गणेश अहीरकर वय २६ वर्ष रा. विनोबा भावे वार्ड, रामटेक यांचे ताब्यातुन रोख १०६००/- रू तसेच एक विवो कंपनीचा मोबाईल आरोपी क्र ७) प्रशांत पुरूषोत्तम उराडे वय ३५ वर्ष रा. शनिवारी वार्ड रामटेक यांचे ताब्यातुन ३६२००/-रू . एक आयफोन व दुसरा वन प्लस कपंनीचा मोबाईल मिळुन आला. आरोपी क्र ८)रामकुमार उसाळु बंदेवार वय ४० वर्ष रा. आंबेडकर वार्ड शिवनी मध्यप्रदेश यांचे ताब्यातुन १३३००/- व एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल ९) विवेक ईश्वरीप्रसाद श्रीवास्तव वय ४५ वर्ष रा. शिवनी मध्यप्रदेश यांचे ताव्यातुन २०९००/- रोख व एक रेडमी कंपनीचा मोबाईल फोन आरोपी क्र १०) बंटी किशोर खिचर वय ३९ वर्ष रा कामठी जि नागपुर यांचे ताब्यातुन १६७००/-रू आणि एक विवो कपंनीचा मोबाईल फोन, आरोपी क्र ११) यमल श्रीराम राउत वय २५ वर्ष रा. आराध्यानगर नागपुर, यांचे ताब्यातुन ३५१००/- रू रोख व एक विवो कंपनीचा मोबाईल, आरोपी क्र १२) महेश भैयाजी वरघट वय ४० वर्ष रा रामटेक, यांचे ताब्यातुन ११८००/- व एक वन प्लस कंपनीचा मोबाईल फोन, या सर्वांसमोर ५२ तासपत्ते व ९८२००/- रू मिळुन आले. असा एकुण नगदी ३६२३००/- रू आणि ५२ तासपत्ते पंचासमक्ष जप्त करण्यात आले.

तसेच घटनास्थळी एक काळया रंगाचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल व एक सिल्वर रंगाचा विवो कंपनीचा मोबाईल मिळुन आले, घटनास्थळाच्या बाहेर उभ्या असलेले वाहन क्र. १) बजाज पल्सर कंपनी ची दुचाकी क एम एच ४० सीएल ८८६२ क २) होंन्डा अॅक्टीवा दुचाकी क्र एम एच ४० बीएम २९९२ ३) हीरो स्प्लेंडर दुचाकी क्र एम एच ३६ टी ६४८४ क ४) होंडा अॅक्टीवा दुचाकी क्र एम एच ४० वीएम ५४३५ क ५)बजाज एव्हेंजर दुचाकी क्र एम एच ४० एवाय १६९७६) मारोती ब्रिझा चारचाकी वाहन क्र एम एच ४० ५४११ ७) मारोती सुझुकी एक्स्प्रेसो चारचाकी वाहन क्र एमएच ४० सीएच २७३ ८) एक विना नंबर ची टाटा झेस्ट पांढ-या रंगाची चारचाकी वाहन असा एकुण १७ मोबाईल फोन किंमती ७७,०००/-रू, ०५ दुचाकी वाहन किमती २,५०,०००/-रू, चारचाकी वाहन-३ किमती ११,००,०००/- रू एकुण १४,२७,०००/- रू चा अणि १२ आरोपीकडुन मिळालेली रोख रक्कम ३,६२,३००/- असा एकुण १७,८९,३००/- मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.
सदर फार्म हाउस हे दिनेश खिचर यांचे मालकीचे असल्याची प्राथमीक माहीती पोलिसांना हाती लागली.पोलिस निरीक्षक विशाल गिरी पोलिस स्टेशन खापा यांचे तक्रारीवरुव पोलिस स्टेशन रामटेक येथे कलम ४,५, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ अन्वयें गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा पुढील तपास रामटेक पोलिस करीत आहे. कलम ११२ भान्यास मधील किरकोळ संघटीत गुन्हेगारी या कलमानुसार तपास करण्याचे प्रस्तावीत केले आहे
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ, यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,सावनेर अनिल म्हस्के,पोलिस निरीक्षक विशाल गिरी ठाणेदार खापा, पोलिस उपनिरीक्षक बाळु राठोड पोस्टे सावनेर, पोहवा सुधिर यादगिरे पोस्टे केळवद, पोलिस अंमलदार सतिश देवकते, किशोर राठोड, रनधीर गेडाम पोस्टे सावनेर, यांनी यशस्वी रित्या पार पाडली.


