सहा.पोलिस अधिक्षक यांचे पथकाने केळवद येथे गुटखा वाहतुक करणाऱ्यास घेतले ताब्यात…..
महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधीत तंबाखु व गुटख्याची मध्यप्रदेशातुन केळवद मार्गे वाहतुक करणाऱ्यास केळवद पोलिसांनी ताब्यात घेऊन,एकुण ६.२१,०५०/- रू. चा मुद्देमाल केला जप्त….
केळवद(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारे सन व विधानसभा निवडनुक यांचे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागपुर ग्रामीण पोलिस दल सज्ज झालंय ते दररोजच्या होणार्या कार्यवाहीवरुन लक्षात येतय यामधे सावनेर उपविभाग अव्वलस्थानी म्हणता येईल त्यानुसार सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर अनिल म्हस्के यांना गोपनीय माहीती मिळाली की, मध्यप्रदेशातुन सातळी जठामखोरा मार्गे केळवद येथे एका सिल्हर रंगाचे स्वीफ्ट कारमध्ये महाराष्ट्र राज्यात निर्बंधिंत असलेला सुगंधीत तंबाखू व गुटख्याची वाहतुक होत आहे.
अशा गोपनीय माहीतीवरुन त्यांनी त्याचे कार्यालयातील स्टॉफ पाठवला असता सदर स्टॉपने पो स्टे केळवट हद्दीतील केळवद ते जटामखोरा रोडवर जावुन नाकाबंदी करून जटामखोरा गावाकडुन येणाऱ्या सिल्व्हर रंगाच्या मारूती सुझुकी स्वीफ्ट कार क्र. एम. एच. १६ ए.टी. १३४९ ला थांबवून पाहणी केली असता त्यामध्ये १) पान मसाला (पान पराग) किंमती ६७,२००/- रू. २) सुगंधीत तंबाखु (बागबान ४७) किंमती ५८,०००/- रू ३) सुगंधीत तबासु (रत्ना नं. ३०००) किंमती २३. ६००/- रू. ४) सुगंधीत तंबाखु (जनम ५३५) किंमती ४७.२५०/- रु. ५) सुगंधीत तंबाखु (गोल्ड) किंमती २५,०००/- रु . असा महाराष्ट्र राज्यात उत्पादन, साठा, वितरण, वाहतुक विक्रीस निबंध असलेला संगुधीत तंबाखु व गुटखा मिळुन आल्याने कार चालक व मालक गोपाल शेषराव कोल्हे वय ३८ वर्ष रा. वार्ड क्र. ०५ तेलीपुरा केळवद याचे ताब्यातुन वरील वर्णनाचा सुगंधीत तंबाखु व गुटखा किंमती २.२१,०५०/- रू. तसेच मारूती सुझुकी स्वीफ्ट कार क्र. एम एच. १६ ए.टी. १३४९ किंमती ४,००,०००/– रू. असा एकूण ६,२१,०५०/- रू. चा माल जप्त करण्यात आला.
त्यानंतर अन्न व औषधी प्रशासन नागपुर यांना माहीती दिल्यावरून श्रीमती एस.व्ही. बाभरे अन्न सुरक्षा अधिकारी हे पो.स्टे. केळवद येथे हजर येवून त्यांनी गुन्हा नोंद होण्यासाठी दिलेल्या लेखी फिर्यादीवरून पो. स्टे. केळवद येथे भारतीय न्यास संहिता २०२३ चे कलम १२३, २२३ सहकलम अन्न सुरक्षा व मानदे कायदा व त्या अंतर्गत नियम व नियमन चे कलम २६ (१), २६ (२) (पअ), २७ (३) (म), ३०(२) सह कलम ३(१) (२२) (पप) (अ) शिक्षापात्र कलम ५९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असुन तपास सुरू आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ,सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,सावनेर अनिल म्हस्के यांचे मार्गदर्शनात पोहवा अनिल मुंढे, पोशि नितेश पुसाम, पियुष वाडीगे यांनी केलेली आहे.