
वाळुची चोरटी वाहतुक करणारे भिवापुर पोलिसांचे ताब्यात…
अवैधरित्या रेती(वाळुची) चोरटी वाहतुक करणाऱ्यांना भिवापुर पोलिसांनी ताब्यात घेऊन,वाहनासह एकुण ३५६०००० /- रूपयाचा मुद्देमाल केला जप्त…
भिवापुर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नागपुर ग्रामीण हर्ष पोद्दार यांनी अवैध धंदे संबंधात तसेच अवैधरित्या वाळुचा साठा व वाहतुक करणाऱ्यांवर कडक कार्यवाहीचे आदेश सर्व प्रभारींना देण्यात आले होते त्याअनुषंगाने
पोलिस स्टेशन भिवापूर अंतर्गत दि(१८)रोजी टिप्परद्वारे अवैध रेती वाहतुक केली जात आहे. अशा मिळालेल्या गोपनिय माहीती वरुन पोलिस स्टेशन भिवापूरचे पथकाने पोस्टे हद्दीत मौजा तास कॅालोनी जवळ व मौजा मानोरा फाटा येथे नाकाबंदी लावुन अवैध वाहतुक करणारे एकूण २ टिप्पर थांबवुन तपासले असता त्यात १) १०
चक्का टिप्पर क्र. एम एच ४० / बी एल – ६१९१ किं २०,००,००० /- रू. व त्यामध्ये ५ ब्रास विना रॉयल्टी भरलेली रेती किं. ३०,००० /- रू. २) टिप्पर क्र. एम एच – ४० / बी जी – ७७५० किंमती १५,००,०००/–रू. व त्यामध्ये ६ ब्रास विना रॉयल्टी भरलेली रेती किंमती ३०,००० /- रू. असे रेतीसह टिप्पर ताब्यात घेवुन असा एकूण दोन्ही वाहनासह ३५६०००० /- रु. चा मुददेमाल जप्त केला आहे.
त्यावरुन १० चक्का टिप्पर क्र. एम एच – ४० / बी एल – ६१९१ चा चालक आरोपी १) संदीप अरूण मदनकर, वय ३२ वर्ष रा. येनोडा ता. पवनी जि. भंडारा व मालक २) राकेश रमेशजी गेडाम रा. तास कालोनी ता. भिवापुर जि. नागपुर तसेच टिप्पर क्र. एम एच – ४० / बी जी – ७७५० चा चालक आरोपी नामे- ३) अश्विन कुलदिपक मेश्राम, वय २५ वर्ष, रा. कोरंभी ता. पवनी जि. भंडारा ४) मालक दुर्गेश शिवशंकर ब्रम्हे वय २९वर्ष रा. वार्ड क्र २३ उमरेड ता. उमरेड जि. नागपुर ५) गाडी मालक प्रणय नरेंद्र हरडे, रा. गाडगेबाबा ले आऊट शिवमंदीर हनुमान नगर ता. नागपुर जि. नागपुर ६) घाट मालक रा. वलनी ता. पवनी जि. भंडारा अशा एकूण ०६ आरोपी विरुध्द कलम ३७९, १०९, ३४ भादंवी सहकलम ४८ (७), ४८ ( ८ ) महा जमीन महसुल अधिनियम १९६६,सहकलम ४, २१ खाण आणि खनिज अधिनियम १९५७ सहकलम ३ सार्वजनीक मालमत्ताचे नुकसान प्रतिबंध अधिनियम १९८४ अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. यातील आरोपी क्र. १ ), ३) व ४) यांना अटक करण्यात आली आहे.


सदरची कार्यवाही ही पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार, अपर पोलिस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे भिवापूर येथील ठाणेदार सपोनि जयप्रकाश निर्मल, पोउपनि संदीप सडमेक, परी. पोउपनि किरण महागावे, पोहवा आनंद धात्रक, राकेश त्रिपाठी, पोशि स्वप्नील ठाकरे, वासुदेव समर्थ, प्रितम खोपे
यांनी पार पाडली.



