कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची केलवद पोलिसांनी केली सुटका…
मध्यप्रदेशातुन पांढुर्णा-नागपुर महामार्गाने हैद्राबाद येथे कत्तलीकरीता गोवंशीय जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करुन जनावरांना दिले जिवनदान,केळवद पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी….
केळवद(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की दि.(९) रोजी पोलिस स्टेशन केळवद येथील पथक हे खाजगी वाहनाने १०.४० चे सुमारास पो स्टे परीसरात पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली कि, पांढुर्णा ते नागपुर रोडने आयसर ट्रक क्र एम एच २९ बी ई ७३३३ मध्ये गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी अवैध्यरित्या वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या खबरे वरून सावळी फाटा येथे पोहचुन नाकाबंदी करीत असतांना ११,४५ वा चे सुमारास दरम्यान पांढुर्णा कडुन आयसर ट्रक क्र एम एच २९ बी ई ७३३३ हे नाकाबंदीचे दिशेने येताना दिसला. सदर वाहन चालकास हाताने वाहन थांबविण्याचा ईशारा केला असता आयसर ट्रक क एम एच २९ बी ई ७३३३ चे चालकाने आपले ताब्यातील आयसर नाकाबंदीचे ठिकाणी न थांबविता सावनेर
चे दिशेने पळु लागला त्याचा स्टॉप व पंचासह खाजगी वाहनाने पाठलाग केला असता आयसर ट्रक क्र एम एच २९ बी ई ७३३३ चे चालकांनी आपले ताब्यातील वाहन सावळी फाटयाचे थोडे दुरवर जावुन थांबवले व आयसर ट्रक क्र एम एच २९ बी ई ७३३३ हे पांढुर्णा ते नागपुर जाणाया रोडवर उभे करून जंगली झुडपाचा फायदा घेवुन पळुन गेला.
सदर वाहनाची पाहणी केली असता मागच्या डाल्यात पिवळया रंगाची ताडपत्री बाजुला करून पंचासमक्ष पाहणी केली असता त्या मध्ये १) ०७ नग गाई / कालवड गौवंश प्रत्येकी किंमत १०,००० /- रू प्रमाणे किंमत ७०,०००/- रू २) १३ नग गोरे गौवंश प्रत्येकी किंमत १५,०००/–रू प्रमाणे किंमत १,९५,०००रू व ०३ नग मृत गोरे / कालवड किंमत ०० /- रू असे एकुन २,६५,०००/- रू चे गोवंशीय जनावरे यांना अत्यंत क्रुर व निर्दयतेने वाहनात डांबुन दोरीने पाय व तोंड बांधुन चा–या पाण्याची सोय न करता दाटीवटीने अपु-या जागेत कोंबुन असल्याचे दिसले. करीता पंचासमक्ष
सविस्थर घटनास्थळ जप्ती पंचनामा कार्यवाही मौक्यावर करून १) ०७ नग गाई/ कालवड गौवंश प्रत्येकी किंमत १०,०००/-रू प्रमाणे किंमत ७०,०००/- रू २) १३ नग गोरे गौवंश प्रत्येकी किंमत १५,००० /- रू प्रमाणे किंमत १,९५,०००रू व ०३ नग मृत गोरे / कालवड किंमत ०० /- रू असे एकुन २,६५,०००/- रू चे गोवंशीय जनावरे व आयसर ट्रक क्र एम एच २९ बी ई ७३३३ किंमत १०,००,००० /- रू असा एकुन १२,६५,००० /- रू चा माल जप्त करण्यात आला.
जप्त करण्यात आलेल्या गोवंश जनावरांना पुढील देखभाल व उपचार करीता जय श्री कृष्ण भगवान गोशाळा गोंडेगाव, ता. नरखेड येथे दाखल करून पशु वैदयकिय अधिकारी यांचे कडुन एम एल सी अहवाल व ०३ नग मृत गोरे / गोवंश यावरुन पोलिस स्टेशन केळवद येथे कलम ४२९, २७९, ३४ भादंवि सह कलम ११(१)(घ)(ड) (च) प्रा. नि. वा. प्रति अधिनियम १९६० सहकलम ५(अ), ९ म. प्रा. संरक्षन अधि. १९९५ सहकलम ११९ म.पो.का सहकलम १८४ मो.वा.का प्रमाने गुन्हा करण्यात येत आहे.
सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार , अपर पोलिस अधिक्षक, रमेश धुमाळ ,उपविभागिय पोलिस अधिकारी सावनेर अनिल म्हस्के,सहा पोलिस निरीक्षक राकेश साखकर, ठाणेदार
पोलिस स्टेशन केळवद यांचे मार्गदर्शनात पोहवा दिनेश काकडे ब पोशि गणेश उईके, पंकज शहारे, सचिन सलामे यांनी केली. पुढील तपास पोहवा दिनेश काकडे हे करत आहेत.