मौदा पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत कत्तलीसाठी जाणाऱ्या ३७ गोवंशीय जनावरांना दिले जिवनदान,आरोपीं अटकेत…
अवैधरित्या कत्तलीसाठी जाणाऱ्या ३७ गोवंशीय जनावरांना मौदा पोलीसांनी दिले जिवनदान,एक ट्रक व बोलेरो सकट १९ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त….
मौदा(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत असे की,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी अवैधधंदे संबंधाने सर्व प्रभारींना दिलेल्या आदेशाने सर्व पोलिस स्टेशन स्थरावर सततच्या होणार्या कार्यवाह्या ह्या सर्वक्ष्रुत आहेतच त्यानुसारच दि(01) ॲाक्टोबर 2024 रोजी पोलिस स्टेशनचे पथकातील पोलिस हवालदार राजु गौतम, पोलीस अमंलदार अतुल निंबार्ते, शुभम ईश्वरकर पोलिस ठाणे मौदा परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन खबर मिळाली की, भंडारा कडुन नागपुर कडे ट्रक क्रमांक MH-40-BL-5498 मध्ये जनावरे भरुन त्याची अवैध वाहतुक करुन कत्तलीकरीता नेत आहे
अशा माहीतीवरुन पोलिस शिपाई अतुल निंबार्ते यांनी कोणतीही दिरंगाई न करता सदर माहीती विभागीय गस्ती मध्ये असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद घोंगे पोलिस ठाणे मौदा यांना त्वरीत दिली असता पोलिस निरीक्षक प्रमोद घोंगे हे सोबत असलेले सफौ भास्कर मेटकर पोहवा जिवन देवांगन यांना घेवुन वडोदा शिवारात झुल्लर फाटा येथे येवुन नाकाबंदी केली असता भंडाराकडुन येत असलेल्या ट्रक क्रमांक MH-40-BL-5498 यास थांबवुन वाहनाची तपासनी केली असता सदर वाहनात जनावरांची कोणतीही चारा पाण्याची सोय न करता एकमेकांना बांधलेली जनावरे वाहनाचे डाल्यात लहान मोठे धरुन 25 गोवंश प्रत्येकी 10,000 रुपये प्रमाणे एकुन कींमती 2,50,000/- रुपये व टाटा ट्रक क्रमांक MH-40-BL-5498 कींमती 10,00000/- रुपये असा एकुन 12,50,000/- रुपयाचा माल मिळुन आल्याने जप्ती पंचनामा कार्यवाही करुन वाहनात असलेले जनावरे ध्यान फांउन्डेशन गोशाळा खरबी जिल्हा भंडारा येथे सुरक्षितते करीता दाखल करण्यात आले.
तसेच पोलिस अमंलदार अतुल निंबार्ते यांचे फिर्यादीवरुन ट्रक क्रमांक MH-40-BL-5498 चा चालक मुसा अमान नसीम अक्तर वय 23 वर्ष रा. वारिसपुरा कामठी जि. नागपूर यांचे विरोधात कलम 5अ (1), 9 महाराष्ट्र पशु सवंर्धन कायदा 1976 11(1) (ड), 11(1) (ई), 11(1) (फ), प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा 1960 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
त्याचप्रमाणे दुसर्या एका कार्यवाहीत पोलिस पथक महामार्गावर हजर असतांना भंडारा कडुन नागपुर कडे बोलेरो पिकअप MH-36-AA – 3241 मध्ये जनावरे भरुन त्याची अवैधरित्या वाहतुक करुन कत्तलीकरीता नेत आहे अशी माहीती मिळताच पोलिस निरीक्षक प्रमोद घोंगे पोलिस ठाणे मौदा पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे यांनी परत हल्दीराम कंपणी गेट क्र. 4 चे समोर सोबत असलेले स्टॉफ सह बॅरिगेट लावुन नाकाबंदी करीत असता भंडाराकडुन येत असलेल्या बोलेरो पिकअप MH-36-AA-3241 चे चालकास थांबण्याचा ईशारा केला असता वाहन चालकाने आपले वाहन रोडचे कडेला थांबवुन अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला त्याचे सोबत असलेला वाहक हा मिळुन आल्याने सदर वाहनाची तपासनी केली असता सदर वाहनात निर्दयतेने एकमेकांना बांधलेले जनावरे वाहनाचे डाल्यात लहान मोठे धरुन 12 गोवंश प्रत्येकी 10,000/- रुपये प्रमाणे एकुन कीमती 1,20,000/- रुपये व बोलेरो पिकअप MH-36- AA-3241 कींमती 5,00,000/- रुपये असा एकुन 6,20,000 रुपयाचा माल मिळुन आल्याने जप्ती पंचनामा कार्यवाही करुन वाहनात असलेले जनावरे सुरक्षेच्या दृष्टीने व चारापाण्याची सोयी करीता ध्यान फांउन्डेशन गोशाळा खरबी जिल्हा भंडारा येथे दाखल करण्यात आल्या
तसेच पोलिस अमंलदार अतुल निंबार्ते यांचे फिर्यादीवरुन बोलेरो पिकअप MH-36-AA-3241 चा फरार असलेला चालक रोहीत रमेश गभणे रा. बाजार वार्ड लाखनी तसेच मिळुन आलेला वाहक श्रीकांत तुलसीराम नागरीकर वय 25 वर्ष रा. लाखनी यांचे विरोधात कलम 5अ (1), 9 महाराष्ट्र पशु सवंर्धन कायदा 1976 11(1) (ड), 11(1) (ई), 11(1) (फ), प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा 1960 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक हर्ष ए पोद्दार,अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ,उपविभागिय पोलिस अधिकारी,कामठी विभाग संतोष गायकवाड,पोलिस निरीक्षक प्रमोद घोंगे पोलिस ठाणे मौदा यांचे मार्गदर्शनात सहा. फौ. भास्कर मेटकर, पोहवा राजेंन्द्र गौतम, जिवन देवांगन, पोलीस अमंलदार अतुल निंबार्ते, शुभम ईश्वरकर यांनी केली .