कन्हान हद्दीतील बारवरील दरोड्यातील सर्व आरोपींना कन्हान पोलिसांनी १२ तासाचे आत केले जेरबंद….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

कन्हान हद्दीतील योग बार मध्ये धारधार शस्त्रासह दरोडा टाकणार्या टोळीला कन्हान पोलिसांनी  १२ तासाचे आत केले गजाआड…..

कन्हान(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,कन्हान हद्दीत काद्री मधील योग बार मध्ये दिनांक ३०/०८/२०२४ च्या रात्री ०९.०० वाजे दरम्यान यातील फिर्यादी  दिनदयाल रामदास बावनकुळे वय ५० वर्ष रा. निलज खंडाळा कन्हान हे काउंटर वर हजर असताना ५ अज्ञात इसम त्यापैकी ३ इसमाच्या हातात चाकु व एकाच्या हातात लाकडी डंडा होता. त्यांनी बार मध्ये येवून काउन्टर वर डंडयाने व चाकुने मारून टेबलावर  ठेवलेले ग्लास चे ट्रे फोडून नुकसान केले. तसेच बारमालकाच्या खिशातील १०००/रू बळजबरीने हिसकावून घेतले तसेच बारमधील रॉयल स्टॉगचे ३ पाईट प्रत्येकी ५२०/रू प्रमाणे एकुण १५६०/रू व मॅजीक मोमेन्टची निप कि. २८०/रू जबरीने घेतली आणि बारमध्ये तोडफोड करून पिण्याचे पाण्याचे १२ काचेचे ग्लास कि. २७६/रू व शोकेशचा फायबर सिट फोडले कि. १५०००/रू अशा एकुण १५२७६/रू चे नुकसान केले. व बारमधून निघतानी चाकु व दंडयाचा धाक दाखवून जिवाने मारण्याची, पाहून घेण्याची धमकी दिली. अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून पो.स्टे. कन्हान अप क. ५१४/२४ कलम ३०९ (४), ३२४ (४) (५), ३५१ (१) (२), ३ (५) भारतीय न्याय संहीता सहकलम ४,२५ भारतीय हत्यार कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर  गुन्हयाचे तपासात  तांत्रीक विश्लेषनाचे आधारे ५ आरोपींना निष्पण करुन कलम ३१०(१) भा.न्या.स. ही कलमवाढ करण्यात आली.





गुन्हा नोंद होताच ठाणेदार राजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून तपास स.पो.नी. राहूल चव्हान यांचे डि.बी पथकाला मार्गदर्शन केले. उपविभागीय अधिकारी  रमेश बरकते यांनी घटनास्थळी भेट देवून पोलिस अधिक्षक यांना  घटनेची माहीती  पोलीस अधिक्षक  हर्ष पोद्दार यांच्या आदेशाप्रमाणे यांनी तात्काळ दरोड्याचे गार्भीर्य लक्षात घेवून कन्हान पोलिसांना मार्गदर्शन केले. घटनास्थळावरील सि.सि.टि.व्ही फुटेज मध्ये सर्व घटनाक्रम स्पष्ट चित्रीत झाल्याने डि.वी. पथकाने गुन्हयात ५ आरोपी असल्याची खात्री झाली. त्यानुसार आरोपीचे फुटेज पाहून नागपूर परीसरात वेगवेगळया टिमव्दारे आरोपींची ओळख पटविताना आरोपी हे कळमना नागपूर येथील असल्याची खात्रीशिर माहीती मिळाली.



त्यानुसार कळमना नागपूर येथून आरोपीचा शोध घेतला असता तांत्रीक पध्दतीने व गुप्त बातमीच्या आधारे त्याचे ठिकाण शोधून चपळाईने नशेतधुर्त असलेले चारही आरोपींना चपळाईने धारदार शस्त्रासह ताब्यात घेतले व गुन्हयातील पाचवा आरोपीबाबत विश्वासात घेवून विचारपूस केली असता असता पाचवा आरोपीस सुध्दा निष्पण केले. त्यामुळे सदर गुहयात कलम ३१० (१) भा.न्या.स. ही कलमवाढ करण्यात आली.



सदरची कार्यवाही  पोलिस अधिक्षक  हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधिक्षक  रमेश धुमाळ, यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी रामटेक रमेश बरकते यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलिस निरीक्षक राजेद्र पाटील, सपोनी  राहूल चव्हान, पोहवा हरीश सोनभद्रे, पोहवा नरेश श्रावणकर, पोना अमोल नांगरे, पोना महेश बिसने पोना शैलेश वराडे पोशि अश्विन गजभिये. पोशि/ आकाश शिरसाट, सुशील तेंलग, चापोहवा अजय भगत यांनी यशस्वी रित्या पार पाडली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!