पुष्पा स्टाईल वाळुची तस्करी करणारे खापा पोलिसांनी घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

पुष्पा स्टाईल वाळुला विटांनी झाकुन अवैधरित्या वाळुची वाहतुक करणाऱ्यांविरूध्द खापा पोलिसांची धडक कार्यवाही ०७ आरोपीं व वाहन घेतले ताब्यात….

खापा(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अवैध धंदे कार्यवाही संबंधाने पोलिस स्टेशन खापा येथील पथक दिनांक ०६/१०/२०२४ रोजी पोलीस ठाणे खापा हददीत पेट्रोलींग करीत असतांना पथकास एक  ट्रॅक्टर क्र. एम एच ४० एल ९९१० व विना नंबरचा ज्याच्या ट्रॅालीत संशयीतरित्या विटाचे आत अवैधरित्या वाळु लपुन चोरीने  वाहतूक करतांना मिळुन आला





सदर ट्रॅक्टरला थांबवुन त्याचा चालक ईश्वर सेवकराम धुर्वे, रा. खापा यांना विचारणा केली असता ट्रॅालीमध्ये विटा भरलेल्या असल्याचे सांगितले परंतु त्याचे बोलण्या व वागण्यावरून वरून संशय आल्याने ट्रॅालीमधील दिसत असलेल्या विटाचे थरावर बसलेले मजुर १) गौरीशंकर रामदास भलावी, २) योगेश आजोराम भलावी, ३) राजेश जनकराम धुर्वे, ४) गुड्डु धुडुजी नागनवरे, ५) संदिप मधुकर डुईजोड, ६) शुभम विठोबाजी गाडीगोणे यांना खाली उतरवुन विटा बाजुला हटवुन ट्रॅालीची पाहणी केली असता विटाचे आत पुर्ण ट्रॅाली ही वाळुने भरलेली मिळुन आली



यासंबंधी सदर  चालकास वाळु वाहतुक करण्याचा परवाना व वाळु कोठुन आणली याबाबत विचारणा केली असता त्यांने सांगितले की, सदरची वाळु ही करजघाट खापा येथुन चोरीने भरून आणलेली असल्याचे सांगितले. यावरून ०७ आरोपींसह १) ट्रॅक्टर क्र. एम एच ४० एल ९९१० व विना नंबरची ट्रॅाली  किमंत ६,००,०००/ व १ ब्रास रेती कि. ३०००/- व ३५० विटा किंमत ३५०० असा एकुन ०६,०६,५००/- रूपयाचा मुद्देमाल ०७ आरोपींचे ताब्यातुन पंचासमक्ष  जप्त करण्यात आला



तसेच सदर प्रकरणात पोलिस स्टेशन खापा येथे वरिल ट्रॅक्टर चालक ईश्वर सेवकराम धुर्वे, रा. खापा व १) गौरीशंकर रामदास भलावी, २) योगेश आजोराम भलावी, ३) राजेश जनकराम धुर्वे, ४) गुडडु धुडुजी नागनवरे, ५) संदिप मधुकर डुईजोड, ६) शुभम विठोबाजी गाडीगोणे यांच्या विरूध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ,सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,सावनेर अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विशाल गिरी ठाणेदार, पोलीस स्टेशन खापा, पोउपनि सचिन जंगम, पोलिस अंमलदार पन्नालाल बटाऊवाले यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!