अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणारे सावनेर पोलिसांचे ताब्यात….
सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थ व पान मसाला पदार्थाची वाहतुक करणाऱ्यांवर सावनेर पोलिसांची कारवाई करून एकूण १०,३६,२८० /- रू चा मुद्देमाल जप्त….
सावनेर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. (७)रोजी रोजी सावनेर पोलिस निरीक्षक रविंद्र मानकर यांना गुप्त बातमीदारावरून माहीती मिळाली की नजीकच्या राज्यातुन एका ईनोवा गाडीने सुंगॅधीत तंबाखु गुटख्याची तस्करी होणार आहे अशा मिळालेल्या गोपनीय बातमीवरुन त्यांनी सपोनी एम. एम. मोकाशे, पो.हवा. रविन्द्र चटप,नापोशि रंजन कांबळे ,पोशि अंकूश यांचे सह पाटणसावंगी टोलनाका येथे नाकाबंदी केली असता
छिंदवाडा रोड कडून नागपूर कडे जाणा-या रोडवर एका इनोवा गाडी क्र. एमएच २७ एएफ ९००९ ही येतांना दिसल्याने तिला थांबवून त्यातील ईसमांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे ना अनुक्रमे १) अब्दुल अहफाज अब्दुल खलील वय २४ वर्ष २) वसीम समसुददीन शेख वय २८ वर्षे दोन्ही रा. बडा ताजबाग, नागपूर असे सांगीतले त्यांना ताब्यात घेवून त्यांना विचारपुस करून त्याचे गाडीची तपासणी केली असता, इनोवा गाडी मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुंगधीत तंबाखु व पान मसाला असलेल्या एकुण ४४ बोरी आणी ६ बॉक्स एकूण वजन ४०१.४६ कि.ग्रॅ किमंत ५,३६,२८० /- रू व इनोव्हा गाडी किं ५,००,०००/- असा एकूण
१०,३६,२८०/- चा मुददेमाल, संगणमत करून अवैध रित्या वाहतूक
करतांना प्रत्यक्ष मिळून आल्याने, त्याचेवर पोस्टे सावनेर येथे अप क्रमांक ५५७/२४ कलम २७२, २७३,३२८,१८८ भादवी सह कलम अन्न व मानके कायदा २००६ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलिस अधिक्षक, रमेश धुमाळ,सहा. पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,सावनेर अनिल मस्के यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलिस निरीक्षक रविन्द्र मानकर, सपोनी मंगला मोकाशे, पोहवा रविन्द्र चटप,नापोशि रंजन कांबळे, पोशि अंकुश मूळे यांनी केली असून गुन्हयाचा पुढील तपास सपोनी मोकाशे करत आहे.