
वाळु माफीयाविरुध्द जलालखेडा पोलिसांची धडक कार्यवाही…
जलालखेडा पोलिसांची अवैध्य वाळु माफिया विरूध्द धडाकेबाज कार्यवाही,२९ लाखाच्या वर मुद्देमाल केला जप्त…
जलालखेडा(नागपुर)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २३/०२/२०२४ रोजी सकाळी ०४.४५ वा. चे दरम्यान जलालखेडा पोलिस स्टेशन हद्दीत गस्त चेकींग दरम्यान अवैध धंद्यांना आळा घालण्या करीता पेट्रोलिंग करीत असतांना जुनी नारसिंगी पांदन रोडवर ट्रॅक्टर क्रमांक १) MH40A-4070 व ट्रॉली २) MH 40CQ-6983 व ट्रॉली ३) RTO पासींग नाही व ट्रॉली RTO पासींग नाही ४) RTO पासींग नही ट्रॉली कमांक MH 32 A- 8995 व हे येतांना दिसले याचा पाठलाग करून जुनी नारसिंगी पांधन रस्ता गांवाजवळ त्यांना थांबवुन पाहणी केली असता वरील नमुद चारही ट्रॅक्टर मध्ये अंदाजे ४ ब्रॉस रेती(वाळु) मिळुन आल्याने सदर ट्रॅक्टर चालकास व मालकास ट्रॅक्टर मधील रेतीचे(वाळुचे) रॉयल्टी बाबत विचारले असता त्यांनी रॉयल्टी नसल्याचे सांगितल्याने व सदरची रेती(वाळु)ही चोरीची असल्यांची खात्री झाल्याने वरील चारही ट्रॅक्टर मध्ये ०४ ब्रॉस रेती (वाळु) किंमत २०,०००/- रू व ट्रॅक्टर ट्रॉली किंमती २९,२५,०००/- रू असा एकुण २९,४५,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करून सदर ट्रॅक्टर चालक व मालक यांचे विरूध्द पोलिस स्टेशन अप कमांक ८०/२४ कलम ३७९, १०९ भादंवी सहकलम ४८ (८),४८ (७) महा.ज.म.स. सहकलम, ४, २१ खाणी आणि खनिजे अधि. १९५७ सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा ९८४ अन्वये पोलिस स्टेशन जलालखेडा येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.


सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक,नागपुर ग्रामीण हर्ष पोद्दार,अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ,उपविभागीय पोलिस अधिकारी,काटोल यांचे मार्गदर्शनात जलालखेडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सपोनि चेतनसिंग चौहान,पोउपनि मनोज शेंडे,पोलिस शिपाई हरीहर सोनोने रविंद्र मोहोड, निलेश खरडे संतोष क्षिरसागर
होमगार्ड सैनिकांच्या मदतीने करण्यात आलेली आहे.



