
कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशीय जनावरांना केळवद पोलिसांनी दिले जिवनदान…
जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीस अटक,
पोलिस स्टेशन,केळवद यांची कार्यवाही..,.
केळवद(नागपुर ग्रामीण)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन,केळवद अंतर्गत मौजा उमरी गावाचे ब्रिज जवळ दिनांक ०५/०१/२०२४ रोजी पोलिस स्टेशन केळवद येथील पोलिस पथक पोलिस स्टेशन केळवद हद्दीत नाकाबंदी करीत असताना मुखबिरद्वारे मिळालेल्या खबरे वरुन एक इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोंबुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरुन केळवद पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी जावून नाकाबंदी करुन मौजा उमरी गावाचे ब्रिज जवळ नाकाबंदी करुन आयसर क्र. एम. एच- ४० / सी.टी- ०११५ चा चालक आरोपी नामे- अकबर मामुर खान, वय ३४ वर्ष, रा. खेडी
पोस्ट तलेनी तह. सारंगपुर जि. राजगड (एम.पी) याने आपल्या ताब्यातील वाहनात ४० नग जिवंत बैल गौवंश व ३ नग मृत बैल गौवंश जनावरांना अत्यंत क्रुर व निर्यदयतेने वाहनात डांबुन त्यांना दोरीने पाय व तोंड बांधुन चारा पाण्याची सोय न करता दाटीवाटीने अपुऱ्या जागेत कोंबुन कत्तलीसाठी अवैद्यरित्या वाहतुक करतांना मिळुन आल्याने आरोपीच्या ताब्यातून सदर आयसर क्र एम. एच- ४० / सी. टी-०११५ किंमती १०,००,००० /- रु. मध्ये ४० नग
जिवंत बैल गौवंश किंमती ६,००,००० /- रु ३ नग मृत बैल गौवंश किंमती ०० /- रु. असे एकूण ४३ जनावरे कत्तली करिता घेऊन जात असतांना मिळून आले आहेत. ट्रक चालक यास ताब्यात घेऊन त्यांचेवर कारवाई करुन सदर जनावरे चारपाणी रहाण्याची सोय करिता गौशाला येथे जमा करण्यात आली


सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलिस अधिक्षक डॅा संदीप पखाले,सहाय्यक पोलिस अधिक्षक/उपविभागिय पोलिस अधिकारी,सावनेर अनिल मस्के यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार राकेश साखरकर यांनी केली



