
नाकाबंदी दरम्यान केळवद पोलिसांनी पकडला १ लक्ष रु चा गुटखा…
नाकाबंदी दरम्यान खासगी प्रवासी गाडीने जाणारा गुटखा केळवद पोलिसांनी पकडला,२आरोपींसह १ लक्ष रु चा गुटखा केला जप्त…
केळवद(नागपुर)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आज दिनांक-20/03/2024 रोजी पोलिस स्टेशन केळवद हद्दीत स्टॉपसह पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुप्त माहिती वरुन मौजा – खुर्सापार चेकपोस्ट, (बिहाडा फाटा) खापा नरसाळा शिवार NH-47 वर येथे पोलिस अधिक्षक साहेब, नागपुर (ग्रामीण) यांचे आदेशाने चालु असलेल्या नाकाबंदी मधील स्टॉपसह मौजा- खुर्सापार चेकपोस्ट, (बिहाडा फाटा) खापा नरसाळा शिवार NH-47 येथे नाकाबंदी करीत असताना दिनांक-20/03/2024 चे 1.00 वाजता दरम्यान MR RAI ट्रॅव्हल्स क्र MH-14 CW-4647 ही येताना दिसली सदर ट्रॅव्हल्स नाकाबंदीचे ठिकाणी थांबवुन चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव- गणेशसिंग अमरसिंग कमोजसिंग वय-54 वर्ष रा- कॅपिटल ऑफिस जवळ, छोला रोड, हुजुर भोपाल तह/जि- भोपाल (एम.पी) व ट्रॅव्हल्स चे वाहकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव- सुखराम सुरेश मोंगरे वय-42 वर्ष रा- लोहारिया तह/जि- बैतुल (एम.पी) असे सांगितले व सदर ट्रॅव्हल्स चे डिक्कीची पाहणी केली असता ट्रॅव्हल्स च्या डिक्कीमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतीबंधीत सुगंधीत तबांखु


1) 200 ग्रॅम मजा 108 हुक्का – शिशा तंम्बाकु चे 80 डब्बे प्रत्येकी- – 935/- चे प्रमाणे एकुन-74,800/- रुपये,

2) 96 ग्रॅम चे पान पराग प्रिमियम पान मसाला चे 100 पॉकेट प्रत्येकी 128/- रुपये प्रमाणे एकुन-12,800/- रुपये,

3) 400 ग्रॅम चे ईगल हुक्का- शिशा तंम्बाकु झेन चे 20 पॉकेट प्रत्येकी किंमत- 640/- रुपये प्रमाणे एकुन -12,800/- रुपये असा एकुन किंमत- 1,00,400/- रुपये
चा मुद्देमाल मिळुन आल्याने सदर माल कोणाचा आहे याची चौकशी केली असता ट्रॅव्हल्स मधील प्रवासी नामे- 1) कमल हसम छवारे वय-42 वर्ष रा- इंदिरा नगर, नगरधन तह- रामटेक जि- नागपुर, 2) इमरान मजिद शेख वय-28 वर्ष रा- महात्मा गांधी रोड, गांधी वार्ड, भंडारा जि- भंडारा यांचा माल असल्याचे निश्पन्न झाल्याने सदर सुगंधीत तबांखु हा महाराष्ट्र राज्यात वाहतुक व विक्री करण्यास प्रतीबंध असल्याने सदर ट्रॅव्हल्स मध्ये असलेला सुगंधीत तबांखु अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य नागपूर विभाग नागपूर यांना माहीती देवुन त्यांच्या मार्फत पुढील कार्यवाही करण्याची तजविज ठेवण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ,उपविभागिय पोलिस अधिकारी/सहा.पोलिस अधिक्षक,सावनेर अनिल मस्के यांचे आदेशानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश साखरकर ठाणेदार पोलिस स्टेशन केळवद यांचे मार्गदर्शनाखाली ,श्रेणी पोउपनि गुणेश्वर डाखोले, पोहवा दिनेश काकडे,नापोशि दिपक इंगळे,पोशि धोंडुतात्या देवकाते


