गांजा तस्करी करणारे नागपुर स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

गांजा तस्करी करणारा  ८६ किलो ७२० ग्रॅम गांजासह गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिण ची कारवाई…

नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण  हर्ष ए. पोद्दार यांचे आदेशाने व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक ०१/०१/२०२४ रोजी नागपुर उपविभागात अवैध धंद्यांवर प्रतिबंध घालणे संबंधाने पेट्रोलिंग करीत असताना पोलिस स्टेशन बुट्टीबोरी हद्दीत तेलंगणा कडून नागपूरकडे येणारी गाडी क्र. UP 84 F 8205 या चारचाकी वाहनाने अंमली पदार्थ (गांजाची वाहतूक करीत आहे. अशी खात्रीपूर्वक माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिस स्टेशन बुट्टीबोरी परिसरात चंद्रपूर ते नागपूर रोडवर  अमृतसर पंजाबी ढाबा समोर रूईखैरी शिवार येथे नाकाबंदी केली असता त्यादरम्यान गाडी क्र. UP 84 F 8205 ची झडती घेतली असता वाहनात



१) इकराम हुसैन इक्बाल हुसैन, वय २१ वर्ष, रा, फतेहगंज पुर्वी त. फरिदपूर जी बरेली (यु.पी)



२) राजकुमार अशोककुमार सिवर, वय १९ वर्ष, रा. वॉर्ड नं. १ कलुबास डोगरगढ बिकानेर (राजस्थान)





हे एका पांढऱ्या रंगाच्या बोरीमध्ये गुंगीकारक वनस्पती गांजा बाळगून वाहतूक करतांना मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन १) ८६ किलो ७२० ग्रॅम किंमती ८,६०,००० / – रू. २) गाडी क्र. UP 84 F 8205 किंमती १,५०,००० /- रू. ३) दोन मोबाईल संच किंमती २०,००० /- रू. असा एकूण १०,३०,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध पोलिस स्टेशन बुट्टीबोरी येथे कलम २०, २२ एन. डी. पी. एस. अन्वये गुन्हा दाखल करण्यात
आला असून जप्त मुद्धेमाल, दोन आरोपी व कागदपत्रे पुढील कायदेशीर प्रक्रिये करीता पोलिस स्टेशन बुट्टीबोरी यांचे
ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही ही  पोलिस अधिक्षक  हर्ष पोद्दार,अपर पोलिस अधिक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलिस उपनिरीक्षक आशीष मोरखडे, सहायक
फौजदार महेश जाधव, पोलिस हवालदार अरविंद भगत, गजेंद्र चौधरी, मिलिंद नांदुरकर, संजय बांते, मयूर ढेकळे, सत्यशील कोठारे, पोलिस नायक अमृत किनगे, पोलिस अंमलदार राकेश तालेवार चालक आशुतोष लांजेवार, सुमित बांगडे यांचे पथकाने पार पाडली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!