
सावनेर पोलिसांचा अवैध वेश्याव्यवसायावर छापा…
सावनेर पोलिसांनी केला वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश…
नागपूर (ग्रामीण प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अवैध वेश्या व्यवसाय करणाऱ्या लॉजवर सावनेर पोलिसांनी गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या गोपनीय माहितीची खात्री करून छापा टाकून पीडित मुलींची सुटका केली आहे. यामध्ये आरोपी


१) सुशील नारायण गभिये (वय ३२ वर्षे) रा.वार्ड क्र.२ वाघोडा तह.सावनेर, जि.नागपूर,

२) नंदलाल धोंडबाजी गांवडे (वय ५० वर्षे) रा.मडासावंगी तह.कळमेश्वर, जि.नागपूर,

३) पुरूषोत्तम उमाजी चिंचुळकर (वय ६२ वर्षे) रा.वाकोडी,
४) माही लॉज मॅनेजर विनोद जनार्धन खुपरडे (वय ३८ वर्षे) रा.भालेराव हायस्कूल च्या मागे साई मंदिर सावनेर, ता.सावनेर, जि.नागपूर
यांना अटक केली आहे.या प्रकरणी शासनातर्फे पोउपनि. स्वप्नील मनोहर गेडाम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अप क्र २०७/२०२४ कलम ३७०,३४ सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनीयम १९५६ कलम ३ (२) (ए), ५, (ए) (सि) (डी) प्रमाणे सावनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील गेडाम हे दिवसपाळी डयुटीवर असताना मिळालेल्या गुप्त माहिती वरून धापेवाडा माही लॉज वर नमुद अधिकारी व अंमलदार यांनी, (दि.२४फेब्रुवारी) रोजी चे दुपारी २.३० वा. ते ६.४६ वा.चे दरम्यान छापा टाकला असता, यातील आरोपी माहीलॉज मालक सुशिल नारायणराव गजबिये रा.सावनेर वाघोडा वार्ड नं.२ ता.सावनेर, जि.नागपुर तसेच मॅनेजर विनोद जर्नादन खुरपडे रा.सावनेर वार्ड नं.४ भालेराव शाळेमागे सावनेर ता.सावनेर, जि.नागपुर यांनीं स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता पिडीत मुलींना अधिक पैश्याचे आमिष दाखवून त्यांना यातील आरोपी यांना नमुद ठिकाणी येण्यास सांगून ४ देहव्यापारास जागा उपलब्ध करुन देवून पिडीत मुलींना ग्राहकास पुरवुन कुंटणखाना चालवित होते. तसेच इतर आरोपी ग्राहक हे पिडीत मुलींना देह व्यापाराकरीता मोबदला देऊन त्यांचेसोबत अनैतीक संबंध प्रस्थापीत करून त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करीत असल्याचे मिळून आल्याचे फिर्यादीवरून आरोपीतांविरूध्द अप.क. २०७/२०२४ कलम ३७०,३४ भादवि सह कलम ३. (२) (ए), (सि) (डी) अनैतीक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कार्यावाही ही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार नागपुर ग्रामीण, अप्पर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ, नागपुर ग्रामीण, सहा.पोलिस अधिक्षक अनिल मस्के सावनेर विभाग सावनेर नागपुर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविन्द्र मानकर, सपोनी मंगला मोकाशे, पोउपनि स्वप्नील गेडाम, पोहवा. अतुल खोडनकर, नापोशी. अंकुश शास्त्री, मपोहवा. ज्योती गाडीगोने, पोशी. सतिश देवकते, पोशी. अंकुश मुळे, पोशी. नितेश पुसाम, मपोशी स्वाती लोनकर यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि व्यंकटेश दोनोडे हे करत आहेत.


