
दुकानाचे शटर फोडुन चोरी करणारी टोळी उमरेड पोलिसांच्या ताब्यात…
उमरेड(नागपुर ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन उमरेड येथे दिनांक १८/११/२०२३ रोजीच्या मध्यरात्री मार्केट परिसर व इतर ठिकाणी मोसानी येवुन एकुण ०८ दुकानाचे शटर तोडुन दुकानातील मुद्देमाल व नगदी रक्कम चोरुन नेली होती. सदर प्रकरणात पोलिस स्टेशन उमरेड येथे अप ६६७ / २३ कलम 457, 380, 511, 427,34 भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मार्केट परिसरामध्ये चोरी झाल्यानंतर व्यापार्यांचे मनामध्ये चिंतेचे व भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सदर घटनेच्या ठिकाणावरील सी. सी. टी. व्ही फुटेज गोळा करून घटनेच्या दिवसापासुन उमरेड पोलिसाचे एक पथक नागपुर शहर येथे पोलिस खबरी व लोकांना दाखवुन बातमीदाराकडुन गुप्त माहीती घेत असतांना समजले की, आरोपी हे नागपुर शहर येथील असल्याची दाट शक्यता नाकारतां येत नाही त्याचेवरून उमरेड पोलिसाचे तपास पथक हे नागपुर मध्ये ठाण मांडुन बसले तिथेच सदरच्या आरोपीमधील एका आरोपीची ओळख पटली. ओळख पटलेल्या आरोपीस गुप्त बातमीदाराच्या मदतीने ताब्यात घेवुन त्याला
कसोटीने विचारपुस केली असता त्याने उमरेड येथे गुन्हा केल्याचे कबुल केल्यानंतर त्याने चोरी करतेवेळी माझेसोबत आणखी ०९ आरोपी असल्याचे सांगितले. उर्वरित ०९ आरोपीतांना पकडण्याचे पोलिसासमोर एक मोठे आव्हान होते. तरी उमरेड पोलिसांनी आपले चातुर्य दाखवुन ०९ आरोपीपैकी ०८ आरोपीना ताब्यात घेतले व त्यांना विचारपुस दरम्यान त्यांनी पोलिस स्टेशन उमरेड येथे केलेल्या गुन्हयाची कबुली दिली. त्यांची अजुन सखोल चौकशी केली असता त्यांनी नागपुर ग्रामीण हददीत गुन्हे केल्याची कबुली दिली व बाहेर जिल्हयातील काही गुन्हें उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. सदर आरोपींवर याअगोदर सुदधा अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असुन हे आरोपी सराईत गुन्हे करण्याच्या प्रवृतीचे आहेत. अटक आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
१) जितेंद्र उर्फ बिटटु खन्ना तुळशीराम बिसेन वय २१ वर्षे.


२) अंकित उर्फ सरकार सुरेश पाटील वय २० वर्षे.

३) हिमांशु प्रविण यादव वय २१ वर्षे.

४) राहुल विजय सोलंकी वय १९ वर्षे
५) अथर्व अनिल वाटकर वय १९ वर्षे
६) अपूर्व उर्फ अया विजय कांबळे वय २३ वर्षे
सर्व रा नागपूर व इतर ०३ विधीसंघर्षग्रस्त बालक रा नागपुर – अटक करण्यात आलेल्या आरोपींकडुन गुन्हयात वापरलेल्या एकुण ०५ स्पोर्ट बाईक, ०४ अॅडाईड मोबाईल व नगदी ३८३२०० /- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हयातील तपासात इतर मुददेमाल जप्त करण्याची प्रक्रीया सुरु आहे.
सदर कार्यवाही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार नागपुर ग्रामीण, अपर पोलिस अधिक्षक संदिप पखाले , उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती पुजा गायकवाड नागपुर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली
पोलिस निरीक्षक प्रमोद घोंगे सोबत पोउपनि दिनेश खोटेले पोहवा प्रदिप चवरे, राधेश्याम कांबळे, विष्णु जायभाये पोना पंकज बटटे पोशि संदिप गुटटे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.


