
उमरेड पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघड करुन चोरलेले दागिणे केले हस्तगत…
उमरेड पोलिसांनी अट्टल चोरट्यास ताब्यात घेऊन उघड केला घरफोडीचा गुन्हा,चोरीस गेलेले दागीनेही केले हस्तगत…
उमरेड(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१४)मार्च रोजी दुपारी ०१/०० वा. ते ०२/०० वा. दरम्यान भास्कर श्रीराम जुमडे वय २७ वर्ष, रा. वनिता विद्यालय मंगळवारी पेठ उमरेड हे नेहमी प्रमाणे स्वत:च्या घराला कुलुप लावुन दुकाणात गेले असता कोणीतरी अज्ञात चोराने घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला व घराच्या कपाटातील सोन्याचे दागीने कि. १,९५,००० /- रु. व नगदी १,७५,०००/- असा एकून ३,७०,००० /- रू. चा मुद्देमाल
चोरून नेला अश्या फिर्यादीचे तक्रारीवरुन गुन्हा नोंद करून उमरेड पोलिस तपास करीत होती.
तपासा दरम्यान आरोपीची गुन्हा करण्याची पध्दती नुसार व गोपनीय माहीती द्वारे सदरचा गुन्हा हा प्रविण अशोक डेकाटे वय २५ वर्ष, रा. मोहाडी जि. भंडारा याने केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला नवेगाव बांध जि. गोंदीया येथुन ताब्यात घेवुन त्याला अटक करण्यात आली. दरम्यान त्याच्या कडून (१) एक सोन्याचा पदक असलेलासमंगळसुत्र, (२) सोन्याचा गोफ, (३) दोन सोन्याचे लॉकेट, (४) एक सोन्याची अंगठी, (५) सोन्याचे कानातील रींग (६)सोन्याचे कानातील रींग असा गुन्ह्यात चोरी गेलेला सोन्याचा संपुर्ण १,९५,००० /- रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


नमुद आरोपी याच्या विरूध्द यापुर्वी सुध्दा पोलिस स्टेशन मध्ये घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहे. आरोपी हा घराला कुलुप लागुन बंद असलेल्या घराला लक्ष करीत असतो असे त्याने विचारपुस दरम्यान सांगीतले.

सदरची कामगीरी पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी राजा पवार उमरेड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली उमरेड पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, पो.उप.नि. दिनेश खोटेले, पोलिस अमंलदार प्रदिप चवरे, राधेश्याम कांबळे, पंकज बड़े गोवर्धन शहारे,
समाधान पवार व सायबर सेल चे सतीश राठोड यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.



