पोलिस महासंचालक कृष्ण प्रकाश यांची नळदुर्ग किल्ल्याला भेट

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

अपर पोलिस महासंचालक कृष्ण प्रकाश यांची नळदुर्ग किल्ल्याला भेट…

धाराशिव (प्रतिनिधी)- अप्पर पोलिस महासंचालक कृष्ण प्रकाश हे शुक्रवार (दि.८) रोजी धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते. या निमित्त कृष्ण प्रकाश यांचे नळदुर्ग शहरात आगमन झाल्यानंतर नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांनी त्यांचे स्वागत केले. कृष्ण प्रकाश यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या कामकाजाची पाहणी केल्यानंतर नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत पोलिसांच्या कामाचे कौतुक केले. पोलीस ठाण्याच्या पाहणीनंतर अपर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांनी नळदुर्गच्या प्राचीन-ऐतिहासिक किल्ल्यास भेट देऊन किल्ल्यातील बारादरी,उपली बुरुज, पाणीमहाल यासह इतर प्रेक्षणीय स्थळांची व त्या ठिकाणी असणाऱ्या तोफांची पाहणी केली. उपल्या बुरुजाच्या पायऱ्या चढून बुरुजावर जाऊन त्यांनी किल्ला परिसराची पाहणी केली. त्याचबरोबर किल्ल्यातील बोरी नदीत सुरू असलेल्या बोटिंगची सफर करून त्यांनी बोटिंगचाही मनमुराद आनंद लुटला. त्यांनी किल्ल्यातील सर्व परिसर पाहून पर्यटन व्यावसायिक युनिटी मल्टिकॉन्स कंपनीच्या कामाचे कौतुक केले, या वेळी कंपनीच्या वतीने त्यांचा सत्कार सुध्दा करण्यात आला.





या वेळी त्यांच्यासोबत जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक गौहर हसन, तुळजापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.निलेश देशमुख, उमरग्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.रमेश बरकते, नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल लोखंडे, उमरगा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप पारेकर, लोहारा पोलीस ठाण्याचे घनशाम चिंतले, मुरूम पोलिस ठाण्याचे मच्छिंद्र शेंडगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, पोलिस निरीक्षक शौकत इनामदार, सहाय्यक पोलिस निरीक्षक पिराजी तायवडे, सूरज देवकर, पोलिस उपनिरीक्षक संजय जराड, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे धनंजय वाघमारे आदी उपस्थित होते.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!