
बसमध्ये दागिने चोरी करणारी टोळी गजाआड; नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…
बसमध्ये दागिने चोरी करणारी टोळी गजाआड; नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…
नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात बसस्थानक व शहरात प्रवास करताना महिलांच्या गळयातील व पर्स मधील सोन्याचे दागिणे चोरीचे प्रमाण वाढल्याने चोरट्यांचा शोध करण्याचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांना आदेश दिले होते.


त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांनी त्यांच्या शाखेतील पोलिस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे यांचे पथक तयार करुन नांदेड जिल्ह्यातील बसमध्ये चढताना व प्रवास करता्ना महीलांचे दागीने चोरी करणाऱ्या चोरांचा शोध घेऊन चोरीचे गुन्हे उघडकीस आनण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिस उपनिरिक्षक दतात्रय काळे व त्यांचे पथक बसस्थानक, रेल्वेस्टेशन इतर विविध गर्दीच्या ठिकाणची माहिती हस्तगत करुन त्याचे विश्लेषन करुन तसेच गोपनीय माहीतगार यांच्याकडुन आलेल्या माहितीच्या आधारे नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रवासादरम्यान महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी करणारी एक महिला व तीन इसम यांना नांदेड बसस्थानक येथुन ताब्यात घेतले आहे. त्यांची विचारपुस करुन सखोल चौकशी केली असता त्यांनी पो.स्टे.बजिराबाद, इतवारा, शिवाजीनगर, बारड, कंधार, लोहा, माळाकोळी व माहूर या पो.स्टे. चे हाद्दीत चोरी केल्याचे सांगीतले त्यावरुन रेकॉर्डची पहाणी केली असता एकुण 14 गुन्हे दाखल असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील पोउपनि दत्तात्रय काळे यांची टिम तयार करुन नांदेड जिल्हयातील बसमध्ये चढताना व प्रवास करतांना महीलांचे दागीने चोरी करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवुन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोउपनि दतात्रय काळे व टिम यांनी बसस्थानक, रेल्वेस्टेशन इतर विवीध गर्दीच्या ठिकाणची माहीती हस्तगत करुन त्याचे विश्लेषन करुन तसेच गोपनीय माहीतगार यांचे कडुन माहीती घेवुन कौशल्य वापरुन नांदेड जिल्हयात मोठया प्रमाणात प्रवासा दरम्यान महीलांचे गळयातील पोत चोरी करणारी एक महिला व तीन इसम नाम 1) दुर्गा पि. मोहण हातवळने (वय 28 वर्षे) व्यवसाय मजुरी रा. रमाईनगर देगलूर, 2) हिवराज पि.रामचंद्र उपाध्ये (वय 51 वर्षे), व्यवसाय मजूरी रा. रमाईनगर देगलूर, 3) बालाजी ऊर्फ बली पि. गोविंद कोळगीरे (वय 30 वर्षे) व्यवसाय मजुरी रा.पूर्णव रोड देगलूर ता.देगलूर जि.नांदेड 4) प्रकाश तुकाराम वाघमारे (वय 34 वर्षे) व्यवसाय. मजुरी रा.कळसदाळ ता.भालकी जि.बिदर (कर्नाटक) ह.मु. देगलूर जि.नांदेड यांची चौकशी घेवुन त्यांचे विचारपुस करून सखोल महिला घेतली त्यांनी पो.स्टे. वजिराबाद, इतवारा, शिवाजीनगर, बारड, कंधारळी, लोहा, माळाको व माहुर या पो.स्टे. चे हाद्दीत चोरीचे वर्णन सांगितल्या आहेत त्यांची रेकॉर्डची पहाणी केली या मध्ये एकुण 14 गुन्हे प्राथमीक तपासात दिसून आले आहेत.

उघड केलेला मुद्देमाल पुढील प्रमाणे –

1) एक ऋद्राक्ष मन्याची माळ तुटलेली ज्यात एकुण 40 त्रऋद्धाक्ष आसुन एकुण मन्यासहीत वजन 11.480 ग्रॅम असुन निवळ सोन्याचे वजन 8.430 ग्रॅम असलेली एकूण किं. 41,900/- (बारड पोस्टे.)
2) एक मनी मंगळसुत्राची काळया मन्याची पोत ज्यात सोन्याचे 37 मनी असुन दोन मंगळसुत्राच्या वाटया असलेली एकुण सोन्याचे वजन 5.010 ग्रॅम असलेली एकूण किं.25,050/- (इतवारा पोस्टे.)
3) एक मनी मंगळसुत्राची काळया मण्याची पोत ज्यात सोण्याचे 66 मनी व एक मंगळसुत्र वाटी असे एकुण वजन 5.010 ग्रॅमअसेलेली एकूण किं.25,050/- (इतवारा पोस्टे.)
4) एक सोन्याचे लॉकेट ज्यात एक पॅन्डॉल असलेले एकुण वजन 16.120 ग्रॅम असलेले एकूण किं.89,466/- (शिवाजीनगर पोस्टे.)
5) एक सोन्याचे लॉकेट ज्यात एक ओम चे पॅन्डॉल असलेले एकुण किं. 31,025/- (वजिराबाद पोस्टे.)
6) एक सोन्याचे मिनी गंठन ज्यात दोन मंगळसुत्राच्या वाट्या व लहाण काळे मनी असलेली एकुण वजन 19.400 ग्रॅम असलेली एकूण किं. 1,02,000/- (वजिराबाद पोस्टे.)
7) एक काळया मन्याची पोत ज्यात मंगळसुत्र दोन वाटी मोठे 06 मनी व लहाण 80 मनी असलेली पोत एकुण सोन्याचे वजन 9.480 ग्रॅम असलेली एकूण किं.49,296/-((वजिराबाद पोस्टे.)
8) एक सोन्याचे पॅन्डॉल च काळे मनी असलेली पोत एकुण सोन्याचे मनी 214 असुन सोन्याचे वजन 19.990 ग्रॅम असलेली एकूण किं.1,04,947/-(वजिराबाद पोस्टे.)
9) एक काळे मन्याची पोत ज्यात सोन्याचे एकुण 99 मणी च मंगळसुत्र दोन वाट्या असलेली पोत सोन्याचे वजन 8.020 ग्रॅम असलेली एकूण किं.41,600/- (कंधार पोस्टे.)
10) एक काळया मन्याची पोत ज्यात सेवन पिसचे एकुण सोन्याचे 10 पाने ज्यात सोन्याचे 16 मनी असुन ज्याचे एकुण सोन्याचे वजन 6.040 ग्रॅम असलेली एकूण किं.29,400/- (कंधार पोस्टे.)
11) सोन्याची चैन ज्यात S नावचे पॅन्डॉल असलेले एकुण वजन 6.470 ग्रॅम असलेली एकूण किं. 33,500/- (रामतीर्थ पोस्टे.)
12) एक मिनी गंठन सोन्याचे ज्यात मंगळसुत्र वाटी दोन असलेली व बारीक काळे मनी असलेली पोत एकुण सोन्याचे वजन 12:090 ग्रॅम असलेली एकूण किं.61,200/- (माहूर पोस्टे.)
13) एक काळया मन्याची पोत ज्यात सोन्याचे एकुण मनी 16 व मंगळसुत्राच्या दोन वाटया असलेली पोत ज्यात सोन्याचे वजन 2.500 ग्रॅम असलेली एकूण किं. 12,500/- (लोहा पोस्टे.) असा एकूण जवळपास 6,46,934/- रु मुद्देमालाचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
सदरची कामगिरी ही श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस अधीक्षक नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलिस अधीक्षक नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलिस अधिक्षक भोकर यांचे मार्गदर्शनाखाली, उदय खंडेराय, पोलिस निरीक्षक स्थागुशा, पोउपनि दतात्रय काळे, पोलिस अंमलदार गंगाधर कदम, बालाजी तेलंग, विलास कदम, गणेश धुमाळ, धम्मा जाधव, रंनधिरसिंह राजबंशी, गजानन बयनवाड, दिपक ओढणे, महीला अंमलदार हेमलता भोयर, पंचफुला फुलारी, किरण बाबर, व चालक शेख कलीम, हनुमानसिंह ठाकुर यांनी पार पाडली असून सदर पथकाचे पोलीस अधीक्षक यांनी कौतूक केले आहे.


