
पंजाबमधे खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जुगराजसिंग यास नांदेड पोलिसांनी केले जेरबंद…
पंजाब येथील गँगस्टर अमृतपालसिंग बॉठ याच्या गँगमधील खुनाच्या गुन्हयातील फरार आरोपी जुगराजसिंग पि. काबलसिंग नांदेड पोलिसांच्या ताब्यात…
नादेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्हा तरणतारण राज्य, पंजाब येथील पो. स्टे. जबाल येथील गुरनं 04/2024 कलम 302, 120ब, 34 भादंवि सह कलम 3/25 आर्म अॅक्ट मधील फरार आरोपी नामे जुगराजसिंग पि. काबलसिंग हा पंजाब मध्ये खुन करुन नांदेड पळुन आल्याचे गोपनिय माहिती वरिष्ठांना मिळाली होती. त्यावरुन पोलिस अधीक्षक, नांदेड यांनी नांदेड पोलिसांचे एक पथक तयार करुन वरील फरार आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते.
त्यावरुन सदर पथकाने नांदेड मध्ये दोन दिवस वरील फरार आरोपीचा शोध घेतला व सायवर सेलच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करुन आरोपी मोबाईल लोकेशन हस्तगत केले असता सदर आरोपी हा नांदेड वरुन श्रीगंगानगर एक्सप्रेसने पंजाबकडे निघाल्याचे कळाले. सदर आरोपीचे तिकीट व बोगी नं. व
सिट क्रमांकाची माहिती हस्तगत करुन आरोपी पकडण्यासाठी वाशिम, आकोल्याकडे निघाले. परंतु सदर आरोपी हा चालत्या ट्रेन मध्ये असल्याने त्याचा बोगी व शिट क्रमांक लोहमार्ग पोलिस ठाणे, अकोला यांना सविस्तर माहिती देवून अकोला रेल्वे जंक्शनवर दहा मिनिटे रेल्वे थांबणार असल्याचे सांगून आरोपीस ताब्यात घेणेबाबत कळविले. त्यानंतर लगेच नांदेड पोलिस पथक अकोला रेल्वे स्थानक येथे पोहचुन आरोपीस ताब्यात घेऊन नांदेड पोहचले.
आरोपी जुगराजसिंग यांची सविस्तर चौकशी केली असता तो कुख्यात गँगस्टर अमृतपालसिंग बॉट रा. मियापुर ता. जि. तरणतारण याचा जवळचा हस्तक असून तो तरणतारण येथे राहून त्याच्या गँगसाठी काम करतो. अमृतपालसिंग बॉठ हा सद्या जर्मनी येथे असून तेथून त्याची गँग चालवितो. त्याचेवर पंजाब राज्यात जवळपास 18 ते 20 गुन्हे दाखल असून त्यापैकी 02 गुन्हे बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायदा (UAPA) प्रमाणे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक, श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलिस अधीक्षक, नांदेड अबिनाश कुमार, अपर पोलिस अधीक्षक भोकर डॅा खंडेराव धरणे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक, संतोष शेकडे, पोलीस उप निरीक्षक दशरथ आडे, गंगाप्रसाद दळवी, पोहेकॉ राजु सिटीकर, दिपक ओढणे, सायबर सेल पोशि राजीव बोधगिरे, अनिल बिरादार, अशोक म्हस्के, अकबर पठाण यांनी पार पाडली.




