किनवट हद्दीतील सराफ लुटी प्रकरणात भाऊच निघाला सुत्रधार….
बोधडी येथील सराफा व्यापाऱ्याचे डोळयात मिरची पावडर टाकुन सोन्या-चांदीचे दागीणे व नगदी रुपये लुटणारी टोळी मुद्देमालसह स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद,भाऊच निघाला मुख्य सुत्रधार…..
नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 28/01/2024 रोजी संध्या 6.30 वाजता फिर्यादी दत्ता त्रंबक शहाने वय 55 रा. बोधडी हे त्याचे सराफा दुकान बंद करुन सोने चांदीचे दागीने व नगदी पैसे असलेली बॅग घेवुन घराकडे जात असतांना त्यास बोधडी गावचे रेल्वे अंडर ब्रिज येथे त्यांचे डोळयात मिरचीपुड टाकुन त्याचे जवळील सोने, चांदीचे दागीने व नगदी असे एकुण 7,58,655/-रु माल जबरीने चोरुन नेले वरुन पोलिस स्टेशन किनवट येथे गुरनं 20/2024 कलम 392, 34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्हयाच्या आरोपीचे शोध करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखा,नांदेड यांना दिले होते. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांनी सदर गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोउपनि आनंद बिचेवार यांची एक टिम नेमण्यात आली होती. सदर टिमने मौजे बोधडी गावात
भेट देवुन तेथील माहीतगार यांचे मदतीने आरोपीचा शोध घेवुन गोपनीय माहितीगार नेमुण गोपनीय माहिती घेतली असता
माहिती मिळाली की, संशईत इसम नामे किशोर ऊर्फ बारक्या सोळंके हा गुन्हा घडल्या पासुन फरार होता.
त्यावरुन त्याचा शोध घेतला असता दिनांक 17/04/2024 रोजी रात्री तो रेल्वे स्टेशन नांदेड परीसरात आल्याची माहिती पोउपनि आनंद बिचेवार यांचे टिमला मिळाली त्यांनी त्यास शिताफिने ताब्यात घेवुन गुन्हया बाबत विचारपुस केली असता त्याने सांगीतले
की त्याचा मित्र नामे बाबुराव त्र्यंबक शहाणे रा. बोधडी याने त्याचा भाऊ दत्ता शहाणे याने बाबुराव शहाणे यांचे दुकाणाचे बाजुला सराफा दुकान टाकल्याने त्याचे मनात राग होता. सदर दत्ता शहाणे याचा जाण्याचे व येण्याचे मार्गाची रेकी करुन त्याचे जवळील सोने-चांदीचे बॅग लुटण्याचा डाव फिर्यादीचा भाऊ व यातील आरोपी किशोर उर्फ बारक्या व बाबुराव शहाणे यांनी कट रचुन आरोपी नामे 1) संतोष पि. शिवाजी मुंडे वय 32 वर्षे व्यवसाय शेती रा. शिवशंकर नगर गोकुंदा ता. किनवट जि. नांदेड, 2) दिलीप व्यंकटी मेटकर रा. वडारगल्ली मुदखेड याचे मदतीने सदरची जबरी चोरी केली असल्याचे कबुली दिली.
त्यावरुन आरोपी नामे 1) किशोर ऊर्फ बारक्या पि. तानाजी सोळंके वय 25 वर्षे व्यवसाय मजुरी रा. अकोली ता. उमरखेड जि. यवतमाळ ह.मु. आबादी बोधडी, 2) संतोष पि. शिवाजी मुंडे वय 32 वर्षे व्यवसाय शेती रा. शिवशंकर नगर गोकुंदा ता. किनवट जि.नांदेड, 3. बाबुराव त्र्यंबक शहाणे वय 49 वर्षे व्यवसाय व्यापार रा. शास्त्रीनगर बोधडी ता. किनवट यांचा शोध घेवुन त्यांचे कडुन सोन्या व चांदीचे दागीने किंमती 6,23,015/-रु चे व नगदी रुपये 30,000/- असा एकुण 6,53,015/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व यातील आणखी एक आरोपी दिलीप व्यंकटी मेटकर रा. मुदखेड हा फरार आहे त्याचा शोध घेतला पण तो मिळुन आला नाही त्याचा शोध चालु आहे. वरील तिन आरोपी यांना पो.स्टे. किनवट येथे
पुढील तपास कामी देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे,अपर पोलिस अधिक्षक नांदेड अबिनाश कुमार, अपर पोलिस अधिक्षक भोकर डॅा खंडेराव धरणे, यांचे मार्गदर्शनाखाली,उदय खंडेराय, पोलिस निरीक्षक स्थागुशा, पोउपनि आनंद बिचेवार, पोलिस अंमलदार गंगाधर कदम, सुरेश घुगे, मोतीराम पवार, तानाजी
येळगे, महेश बडगु, मारोती मोरे, गजानन बयनवाड, उदयसिंग राठोड, संजिव जिंकलवाड, चालक मारोती मुंडे, कलीम शेख
यांनी पार पाडली