नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने अवैधरित्या गांजा बाळगणार्यास ताब्यात घेऊन ४१ किलो गांजा केला जप्त….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीत लक्ष्मीनगर भागात स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला 8,27,000/- रु चा  41.350 किलो गांजा…..

नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड जिल्हयात गांजा विक्री करणार्यांचे प्रमाण वाढल्याने या प्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवून कार्यवाही करणे कामी पोलिस अधिक्षक श्रीक्रुष्ण कोकाटे  यांनी स्थानीक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलिस निरीक्षक यांना आदेश दिले होते.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील पोउपनि आनंद
बिचेवार यांची टिम तयार करुन नांदेड शहरात गांजा विक्री करणारे व्यक्ती विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.





त्याअनुषंगाने आनंद बिचेवार पोउपनि स्थागुशा यांचे टिम नांदेड शहरात गोपनिय माहीतगार यांचे कडुन माहीती घेवुन आज दि.(८)  रोजी राजपत्रीत अधिकारी एस .डब्लु. दिगलवार, नायब
तहसीलदार नांदेड, उदय खंडेराय, पोलिस निरीक्षक, स्था. गु. शा. नांदेड व गणेश चव्हाण पो.स्टे. विमानतळ सह महेबुबनगर जवळ लक्ष्मी नगर बायपास रोड नांदेड या भागात एका घरात विक्रीसाठी गांजा ठेवल्याची मिळालेल्या माहीती प्रमाणे सदर ठिकाणी छापा मारुन 1)अहेमदखान पि.अनवरखान वय 28 वर्षे व्यवसाय बेकार रा. रहीमनगर देगलुर नाका नांदेड 2) शेख अकत्तरी बेगम भ्र.शेख मिया वय 55 वर्षे व्यवसाय घरकाम रा. महेबुबनगर जवळ लक्ष्मीनगर बायपास रोड नांदेड ता. जि.नांदेड यांना पकडुन त्यांचे घरातुन एकुण 41.350 किलो गांजा किमंती 8,27,000/- रु जप्त करण्यात आला.



सदरचा गांजा हा आरोपीची आई व नंनद नामे जोहराबी ऊर्फ बब्बा खाला भ्र. अन्नवर खान पठाण रा. टायरबोर्ड नांदेड हीने सदरचा गांजा विक्री करण्यासाठी वरील ठिकाणी ठेवल्याचे प्रथम चौकशीत निष्पन्न आहे. दोन आरोपीस पो.स्टे. विमानतळ येथे हजर केले असुन पोउपनि श्री आनंद बिचेवार यांचे फिर्याद वरुन वरील तिन आरोपी विरुध्द पो.स्टे. विमानतळ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे,अपर पोलिस अधिक्षक नांदेड, अबिनाश कुमार,अपर पोलिस अधीक्षक भोकर खंडेराव धरणे यांचे मार्गदर्शनाखाली,उदय खंडेराय, पोलिस निरीक्षक स्थागुशा, पोउपनि आनंद बिचेवार, पोलिस अंमलदार गंगाधर कदम, संजीव जिंकलवाड, विठ्ठल शेळके, मोतीराम पवार, महेश बडगु, राजबंशी, ज्वालासिंग बावरी, मारोती मोरे, गजानन बयनवाड, महील अमलदार सौ. पंचफुला फुलारी, सौ. हेमलता भोयर, चालक अमलदार शंकर केंद्रे,अर्जुन शिंदे यांनी पार पाडली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!