सराईत मोटारसायकल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन उघड केले गुन्हे…
’सराईत मोटार सायकल चोरटे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड जिल्हयात मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणने करीता पोलिस अधिक्षक, श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलिस निरीक्षक यांना आदेश दिले होते.
त्यांवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील पोउपनि साईनाथ पुयड यांचे पथक तयार करुन नांदेड जिल्हयातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या.त्या अनुषंगाने पोउपनि साईनाथ पुयड व पथक यांनी आरोपींचा शोध घेत असतांना त्यांना माहीतीगाराकडुन मिळालेल्या माहीती प्रमाणे दोन इसम यांचे कडे संशयीत मोटार सायकल आहेत असी माहीती मिळताच त्यांनी सदर
इसमांना ताब्यात घेवुन त्यांची नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) बुध्दभुषण लक्ष्मण शिकारे वय ३० वर्षे रा.जयनगर वसमत जि. हिंगोली, २) साहेबराव मरीबा कांबळे वय ३५ वर्षे रा. सांगवी (उमर) ता. देगलुर असे सांगीतले त्यांचे ताब्यात असलेल्या मोटार सायकल बाबत विचारपुस केली असता त्यांनी काही एक उत्तर दिली नाही. त्यावरुन सदर मोटार सायकल बाबत माहीती घेतली असता एक बजाजा कंपनीची डिस्कव्हर मोटार सायकल ही पो.स्टे. वजिराबाद गु.र.नं ३४५/२०२२ कलम ३७९ भा. द. वी मधील व एक हिरो कंपनीची स्पेल्डर पो.स्टे. हिंगोली शहर गु.र.नं. ५५७/२०२२ कलम ३७९ भा.द.वी मधील चोरीगेलेली निष्पन्न झाले.
सदर गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल आरोपीतांन कडुन खालील प्रमाणे जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलिस अधीक्षक नांदेड,अबिनाश कुमार, अपर पोलीस
अधीक्षक भोकर खंडेराव धरणे यांचे मार्गदर्शनाखाली, उदय खंडेराय, पोलिस निरीक्षक स्थागुशा,पोलिस निरीक्षक गंगाप्रसाद दळवी, सायबर सेल, पोउपनि साईनाथ पुयड, आनंद बिचेवार, पोलिस शिपाई माधव केंद्रे, मोतीराम पवार, मारोती मोरे, धम्मानंद जाधव, दिपक पवार चालक गंगाधर घुगे, हेमंत बिचकेवार,सायबर सेलचे अंमलदार राजु सिटीकर, दिपक ओढणे यांनी पार पाडली