मार्निंग वॅाकला जाणारे नागरिकांचे मोबाईल हिलकावनारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

मॅार्निंग वॅाक करणारे तसेच पायी जाणाऱ्या इसमांचे मोबाईल हिसकावनारे तिन आरोपी मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…..

नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड जिल्हयात सकाळी वॉकींग करणाऱ्या, पायी चालत जाणाऱ्या, बाजारपेठ मध्ये जाणाऱ्या, लोकांचे मोबाईल हिसकावुन गुन्हे करण्याचे प्रमाण वाढल्याने सदर गुन्हेगार यांचा शोध करणेकामी पोलिस अधिक्षक  अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा  येथील पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांना आदेशीत केले  होते.





त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक साईनाथ पुयड यांची टिम तयार करुन नांदेड शहरातील सकाळी वॉकींग करणारे इसमांचे मोबाईल हिसकावुन चोरी करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या.त्यानुसार 26/09/2024 रोजी गोपनिय माहीतगार यांचे कडुन माहीती मिळाली की, शुभम ऊर्फ बंटी प्रकाश दुधमल वय 24 वर्ष व्यवसाय बेकार रा. सुगाव (खु.) ता.जि.नांदेड हा त्याचे सोबत इतर दोन विधीसंघर्षग्रस्त बालक असे शनि मंदिर, जनता गॅरेज प्रभात नगर येथे चोरीचे मोबाईल सॉफ्टवेअर मारण्यासाठी थांबलेले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती



त्यानुसार सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जावून संशयीत इसमांना ताब्यात घेवून विचारणा केली असता, सदर ईसमाच्या ताब्यात जबरी चोरीतील एकूण सहा मोबाईल मिळून आले. सदरचे मोबाईल हे पोलिस स्टेशन भाग्यनगर अंतर्गत मालेगाव रोड व इतर ठिकाणी जबरी चोरी केले असल्याची कबूली दिल्याने सदरचे सहाही मोबाईल दोन पंचा समक्ष जप्त करण्यात आले आहे. जप्त मुद्देमाला बाबत माहिती घेतली असता, जप्त मुद्देमालापैकी एक मोबाईल हा पोलिस स्टेशन भाग्यनगर, नांदेड गु.र.न. 476/2024 कलम 309 (4) भारतीय न्याय संहिता 2023 मधील जबरी चोरीतील मोबाईल असल्याचे निष्पन्न झाले आहे. नमुद आरोपीकडून जप्त केलेले एकूण सहा मोबाईल किंमत अंदाजे 91500/- रुपयाचा व आरोपी हे पुढील कायदेशिर कार्यवाही कामी  पोलिस स्टेशन भाग्यनगर, नांदेड यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.



सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार,अपर पोलिस अधिक्षक नांदेड, सुरज गुरव, अपर पोलिस अधिक्षक,भोकर  खंडेराव धरणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा उदय खंडेराय, पोउपनि साईनाथ पुयड, पोलिस हवा बालाजी तेलंग, राजु सिटीकर, दिपक ओढणे,पोशि संतोष बेल्लुरोड, विलास कदम, बालाजी कदम, तिरुपती तेलंग, मोरे, चालक पोशि गंगाधर घुगे यांनी पार पाडली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!