ईतवारा नांदेड पोलिसांनी उघड केले २ घरफोडीचे गुन्हे,३ आरोपी अटकेत….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

ईतवारा, नांदेड पोलिस स्टेशन हद्दीतील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यास ईतवारा पोलिसांना यश…

नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,श्रीक्रुष्ण कोकाटे पोलिस अधीक्षक यांनी चोरी घरफोडी चे गुन्हे उघडकीस आणने व गुन्हयांना प्रतिबंधक करण्याबाबत सर्व पोलिस ठाणे अधिकारी व अंमलदार यांना आदेशीत केले होते.
पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे , अपर पोलिस अधीक्षक  अबिनाशकुमार, उप विभागिय पोलिस अधिकारी  सुशिलकुमार नायक  यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रणजित भोईटे, पोउपनि  आर.बी. चौधरी यांनी पो.स्टे. ईतवारा गुरनं. 49/2024 कलम 457,380 भादंवी गुन्हयात अज्ञात असलेले आरोपी





1)राजु  श्रावण पवार वय 23 वर्षे, व्यवसाय टाईल्सकाम राहणारा ब्रम्हपुरी चौफाळा नांदेड



2)शेख समीर पिता शेख चाँद, वय 23 वर्षे, व्यवसाय मजुरी राहणार वाजेगांव ता.जि. नांदेड



याना ताब्यात घेवून अटक करुन मा.न्यायालयाकडुन पोलिस कोठडी घेण्यात आली. अटक आरोपींकडुन गुन्हयातील चोरलेल्या मालापैकी  सोन्याचे शॉर्ट गंठन,सोन्याची अंगठी व चांदीचे चैन जोड दोन नग असा एकुण 50,000/- रुपयाचा ऐवज हस्तगत केला आहे व गुन्हा उघडकीस आणला आहे. अटक आरोपीचा साथीदार आरोपी सय्यद अरिफ सय्यद फारुख रा.गाडीपुरा नांदेड हा निष्पन्न केला आहे. तसेच पो.स्टे.ईतवारा गुरनं. 29/2024 कलम 457,380 भादवी गुन्हयात अटक आरोपी राजु श्रावण पवार वय 23 वर्षे, व्यवसाय टाईल्सकाम राहणारा ब्रम्हपुरी चौफाळा नांदेड असल्याचे निष्पन्न करुन नमुद गुन्हयात गेला माल पाण्याची टाकी, प्लेट, पाण्याची मोटार, खुर्ची असा एकुण 9,200/- रुपयाचा ऐवज हस्तगत केला आहे. सदर आरोपींकडुन दोन्ही गुन्हयातील एकुण 59,200/- रु.चा ऐवज हस्तगत केला आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक श्रीक्रुष्ण कोकाटे,अपर पोलिस अधिक्षक नांदेड अबिनाश कुमार,उपविभागिय पोलिस अधिकारी नांदेड सुशीलकुमार नायक यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रंजीत भोईटे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि  चौधरी सफौ   बी.एन.गजभारे, ङिबी. बिसाडे, पोहवा मोहन हाके, एकनाथ मोकले, नापोशि हबीब चाऊस,मिलींद नरबाग,लक्ष्मण दासरवार,धिरज कोमुलवार पोशि काकासाहेब जगताप,नजरेआजम देशमुख, कोरनुळे,गायकवाड,राठोड यानी कर्तव्य पार पाडले आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!