कंधार येथील घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश,२७ लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत…
कंधार येथील घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश,२७ लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत…
नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हयात घरफोडीचे प्रमाणात वाढ झाल्याने श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांना आदेशीत करुन घरफोडया उघड करण्याच्या सुचना दिलेल्या होत्या, त्यावरुन पोलीस निरीक्षक, स्थानीक गुन्हे शाखा नांदेड यांनी पांडुरंग माने, सपोनि स्थागुशा नांदेड यांची एक टिम नेमून नांदेड जिल्हयातील घरफोड्या उघड करण्यासाठी आदेश दिले होते.
फिर्यादी नामे मोहम्मद युसुफ खान रा. कंधार यांनी दिलेल्या तक्रारीत ते हैद्राबाद येथे दवाखाण्यात गेले असता कोनीतरी अज्ञात आरोपीने त्यांचे बेडरुमचे कडीकोंडा तोडुन बेडरुम मध्ये ठेवलले 27,50,000/- रुपये चोरी केली आहे या बाबत तक्रार दिले वरुन पो.स्टे. कंधार येथे दि. 07नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी व गेल्या माला बाबत दि.06डिसेंबर रोजी पांडुरंग माने, सपोनि स्थागुशा नांदेड यांची टिम कंधार येथे जावुन तपास केला असता त्यांना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहीती प्रमाणे इसम नामे मोईन महेबुब जानी शेख रा.छोटी गल्ली कंधार हा यातील फिर्यादीचे घरी नेहमी येने जाणे करीत होता त्यावरुन त्यानेच सदरची चोरी केली असल्याचे संशय आल्याने त्यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता तो यातील फिर्यादी हे हैद्राबाद येथे दवाखाण्यात गेले होते त्याचा फायदा घेऊन मी गेल्या एक महिण्यापुर्वी फिर्यादी नामे मोहम्मद युसुफ खान यांचे बेडरुमचे कुलुप तोडुन आतील ठेवलेले रोखरक्कमेची चोरी केल्याचे सांगुन चोरी केलेली रक्कम 27,50,000/ (सत्ताविस लाख पंन्नास हजार रुपये) त्याच्या ताब्यातुन जप्त केले आहेत. पुढील कारवाई साठी सदर आरोपीस पो.स्टे. कंधार यांच्या ताब्यात दिले आहे.
अशा प्रकारे सदरची कामगीरी श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, डॉ.खंडेराय धरणे, अपर पोलीस अधिक्षक, भोकर, थोरात उप विभागीय पोलीस अधिकारी, कंधार यांचे मार्गदशनाखाली उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, पांडुरंग माने, सपोनि सचीन सोनवणे पोलीस अमलदार संजय केंद्रे, गंगाधर कदम, गुंडेराव करले, देवा चव्हाण, चालक हेमंत बिचकेवार नेमणुक स्थागुशा व पो.स्टे. कंधार येथील आदीत्य लोणीकर, सपोनि, महीला पोलीस अमलदार कांबळे यांनी पार पाडली आहे.