
नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेने शहरात विक्रीसाठी आणलेले सात गावठी पिस्टल व १६७ जिवंत काडतुस केले जप्त…
नांदेड- शहरात घडत असलेल्या गुन्हयांना आळा बसण्यासाठी व अग्नीशस्त्र वापरुन गुन्हे करणारे व अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे गुन्हेगारांवर कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत .पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलिस निरीक्षक, व्दारकादास चिखलीकर यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी शहरात अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपीविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत स्था.गु.शा. चे पथकाला आदेश दिले होते.त्यानुसार दिनांक 02/10/2023 रोजी गुप्त बातमीदाराकडून वाघी ते नाळेश्वर जाणारे रोडवरील आर.टी.ओ.
ऑफीसजवळ काही इसम गावठी पिस्टल खरेदी व विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने सदरची माहिती वरिष्ठांना देवून वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली द्वारकादास चिखलीकर, पो.नि. स्था.गु.शा., नांदेड, सपोनि रवि वाहुळे, पोउपनि दत्तात्रय काळे, प, स्था.गु.शा., नांदेड व पोलिस
अंमलदारांसह नाळेश्वर जाणाऱ्या रोडवरील आर.टी.ओ. ऑफीसजवळ गेले असता पोलिसांची चाहूल लागताच आरोपी


1) कमलेश ऊर्फ आशु पाटील पि. बालाजी लिंबापुरे, वय 23 वर्ष, रा.गॅस गोडाऊनजवळ वसरणीरोड, नांदेड

2) बलबिरसिंघ ऊर्फ शेरा पि. प्रतापसिंघ जाधव, वय 21 वर्ष, रा. गुरु रामदास यात्री निवास, हिंगोली गेट, नांदेड

3) शेख शाहबाज शेख शकील, वय 23 वर्ष, रा.दुध डेअरी, रहीमपुर,
नांदेड व
4) शामसिंघ ऊर्फ शाम्या पि. गेंदासिंघ मठवाले, वय 23 वर्ष, रा. गुरुव्दारा गेट नं.2, तहसिल ऑफीसच्या मागे, नांदेड यांनी पोलीसांवर हल्ला चढवला असता पोलिस पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी योग्य बळाचा वापर करुन त्यांना ताब्यात घेवून त्यांचेकडून बेकायदेशीरीत्या मोठया प्रमाणात खरेदी- विक्रीसाठी आणलेले 7 गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) व 116 जिवंत काडतूस असा एकूण 3,03,000/- रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर आरोपीतांनी हैद्राबाद येथे आशिष सपुरे व रबज्योतसिंघ ऊर्फ गब्या तिवाना दोघेही रा. नांदेड यांचेसह नांदेड येथे मोठया प्रमाणात गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) पुरविण्याचे कटकारस्थान रचले होते. त्यासाठी आशिष सपुरे व रबज्योतसिंघ ऊर्फ गब्या तिवाना हे दोघेही पैसे पुरवित होते.
सदरची कामगिरी श्रीकुष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलिस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलिस अधीक्षक, भोकर यांचे मार्गदर्शनाखाली व्दारकादास चिखलीकर, पोलिस निरीक्षक, स्था. गु.शा, नांदेड, सपोनि रवि वाहुळे, पांडूरंग माने, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, आशिष बोराटे, सचिन सोनवणे, गोविंद मुंडे, सपोउपनि माधव केंद्रे,
पोहेकॉ गुंडेराव करले, बालाजी तेलंग, पोना दिपक पवार, संजीव जिंकलवाड, पोकॉ बालाजी यादगीरवाड, विलास कदम, तानाजी येळगे गजानन बयनवाड पदेवा चव्हाण, रणधिरसिंह राजबन्सी, ज्वालासिंघ बावरी, चापोकॉ हनुमान ठाकूर, शेख कलीम, बालाजी मुंडे व सायबर सेलचे पोहेकॉ दिपक ओढणे,राजू सिटीकर यांनी पार पाडली आहे.


