
राष्ट्रीय तपास यंत्रणा(NIA) यांनी जाहीर केली ४३ कुख्यात बदमाश/गॅंगस्टर ची यादी…
नांदेड – राष्ट्रीय स्तरावर देशात शांतता राखणे गुन्हेगारांची माहिती संकलीत करणे देशविघातक कृत्य करणारे,कुख्यात बदमाश, गॅगस्टर यांची माहिती ठेवणे, त्यांचे हालचालीवर लक्ष ठेवून सदरची माहिती भारत सरकारला देण्याचे काम कायम राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) करीत असते. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) भारत सरकार यांनी काही कुख्यात 43 बदमाश, गॅगस्टर, यांची यादी नुकतीच जाहीर केली असून, सदरचे कुख्यात बदमाश, गॅगस्टर हे फरार आहेत. त्यांचेवर राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) भारत सरकार यांनी बक्षीस जाहीर केलेले आहे. सदरचे आरोपी हे भारतातील कोणत्याही राज्यात, शहरात तसेच इतर देशात आश्रय घेण्याची शक्यता असुन नांदेड शहर हे धार्मीक दृष्टया व गुरुगोविंदसिंघ यांची पावनभुमी म्हणुन जगप्रसिध्द असुन देश विदेशातील भावीक यांची नांदेड शहराहरात मोठया प्रमाणात ये जा असते त्यामुळे नांदेड जिल्हयात व शहरात संशयीत व जाहीर केलेले गुन्हेगार हे
आश्रय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने नांदेड जिल्हयातील व शहरातील हॉटेल, लॉजेस, ढाबे, यात्री निवास, डेरे, सराय, आश्रमशाळा तसेच भाडेकरूंनसाठी खाजगी निवास्थाने पुरविणारे या ठिकाणी आपली ओळख लपवून आश्रय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याकरीता कुठल्याही अनोळखी व्यक्तीस त्यांची पूर्णतः ओळख पटवून जसे आधार कार्ड, मतदान कार्ड, व इतर शासनमान्य ओळखपत्राची चौकशी व शहानिशा तसेच पुर्ण खात्री झाल्यानंतरच त्यांना आश्रय देण्यात यावा. तसेच लॉजेस व हॉटेल चालकांनी त्यांचे राहणेबाबतच्या आवश्यक त्या सर्व नोंदी रजिस्टरला ओळखपत्रासह घेवून अद्यावत ठेवावी व त्याची पुर्ण माहिती संबंधीत पोलिस स्टेशनला द्यावी. तसेच संशयित व्यक्ती अगर वस्तु आपल्या निदर्शनास आल्यास डायल 112, पोलीस नियंत्रण कक्ष, नांदेड येथील 02462-234720 या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस अधीक्षक, नांदेड यांनी जनतेस केले आहे.
त्यांची नावे खालीलप्रमाणे


राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) भारत सरकार यांनी जाहीर केलेले कुख्यात 43 बदमाश, गँगस्टर, यांची यादी
१)लॉरेन्स बिश्नोई
२)जसदिप सिंघ
३)काला जठेडी उर्फ संदीप
४)विरेंदर प्रताप उर्फ काला राणा
५)जोगींदर सिंघ
६)राजेश कुमार उर्फ राजु मोठा
७)राज कुमार उर्फ राजु बिसोदीया
८)अनिल चिप्पी
९)मोहम्मद शहबाज
१०)गोल्डी बरार अन्सारी
११)सचिन थापन बिश्नोई
१२)अनमोल बिश्नोई
१३)विक्रमजित सिंघ उर्फ विक्रम ब्रार
१४)डरमन सिंघ उर्फ डरमनलोट खालोन
१५)अर्शदिप सिंघ गिल
१६) सुरेंदर सिंघ उर्फ चिक्कु
१७)दलीप कुमार उर्फ भोला
१८)प्रविण वाधवा उर्फ प्रिंस
१९) युध्दवीर सिंघ
२०)विकास सिंघ
२१)लखबीर सिंघ उर्फ लांडा
२२) गौरव्ह पटीयाल उर्फ सौरव्ह ठाकुर
२३) सुखप्रित सिंघ उर्फ बुड्डा
२४)अमित डागर
२५) कौशल चौधरी
२६)असिफ खान
२७)नाविद डबास उर्फ नविन बाली
२८) छोटु राम उर्फ भट
२९)जगसीर सिंघ उर्फ जग्गा
३०)सुनिल बलवान उर्फ टिल्लू ताजपुरीया
३१) भुपिंदर सिंघ उर्फ भुप्पी राणा
३२) संदिप उर्फ बांदर
३३)सुखडोल सिंघ
३४) गुरूपिंदर सिंघ
३५)निराय उर्फ पंडीत
३६) दलेर सिंघ
३७)दिनेश शर्मा
३८)मनप्रित सिंघ पित्ता
३९)हरीओम उर्फ टिटु
४०)हरप्रित
४१) लखविर सिंघ
४२) इरफान उर्फ चन्नु पहेलवान
४३) सन्नी डागर



