आय टी आय परीसरात झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात नांदेड पोलिसांना यश….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

शिवाजीनगर(नांदेड)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस ठाणे शिवाजीनगर हद्यीमध्ये आयटीआय कॉलेज परीसरात एक मयताचे प्रेत दिनांक 17/11/2023 रोजी दिसुन आले होते. सदर मयताचे नाव प्रतिक महेंद्र शंकपाळ रा आंबेडकरनगर नांदेड असे असल्याचे समजले. नमुद प्रकरणामध्ये पोलिस ठाणे शिवाजीनगर गुरनं. 411/2023 कलम 302 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेवुन अटक करण्याबाबत  श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस अधीक्षक, नांदेड यांनी पोलिस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन आरोपीचा शोध घेणे कामी रवाना केले होते.
दिनांक 17/11/2023 रोजी स्थागूशा चे पथकास गूप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, नमुद गुन्हा करणारे आरोपी हे मोहम्मद फंक्शन हॉल खडकपुरा नांदेड येथे असल्याबाबत माहीती मिळालेने त्यांनी तशी माहीती वरीष्ठांना देवुन स्थागुशा चे पथकाने सापळा रचुन आरोपी नामे

1) आवेस इस्माईल पठाण वय 20 वर्ष व्यवसाय बेकार रा. बालाजी नगर हिंगोली नाका, नांदेड





2) एक विधीसंघर्षीतबालक



यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. वर नमुद गुन्हयातील आरोपी निष्पन्न करुन नमुद आरोपीतांना पोलिस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हयाचे पुढील
तपासकामी देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी  श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस अधीक्षक, नांदेड,अबिनाश कुमार अपर पोलिस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलिस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, उदय खंडेराय, पो. नि. स्थागूशा नांदेड, सपोनि रविकुमार वाहुळे, पांडुरंग
माने, पोउपनि सचिन सोनवणे, आशिष बोराटे, जसवंतसिंघ शाहु सपोउपनि  माधव केंद्रे, पोहवा गुंडेराव करले, पोना विठ्ठल शेळके, पोशि ज्वालासिंघ बावरी, देवा चव्हाण, गजानन बयनवाड, विलास कदम, मारोती मुंडे सर्व नेम- स्थागुशा, नांदेड यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे पोलिस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!