नांदेड शिवाजीनगर पोलिसांनी उघड केला जबरी चोरीचा गुन्हा,१५ लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

नांदेड(प्रतिनिधी) –  पोलिस स्टेशन शिवाजीनगर येथील गुन्हे शोध पथकांची धडाकेबाज कामगीरी चोरीस गेलेले 30 तोळे सोन्याचे दागीने किंमत 15,10,000/- रुपये चा मुद्देमाल आरोपीकडुन केला जप्त.

सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 19.11.2023 रोजी सकाळी 08.00 वाचे सुमारास यातील फिर्यादीने फिर्यादी दिली की, फिर्यादी हे वसंतनगर,नांदेड येथील राहते घराचे दरवाज्यांना कुलुपकोंडा लावुन संपुर्ण परीवारासह तिरुपती येथे देव दर्शनासाठी गेले होते. त्यांचे घराचे कोणीतरी अज्ञात चोरटयाने कुलुप कोंडा तोडुन घरात प्रवेश
करुन घरामधील लाकडी पलंगा मध्ये ठेवलेले सोन्याचे दागीने एकुण 32.5 तोळे आजच्या किंमती 16,28,000/- रु चे दागीने चोरीस गेले होते. दिनांक 22.11.2023 रोजी चे 09.00 वा. सदर घटनेबाबत माहीती मिळताच पोस्टे शिवाजीनगर चे अधिकारी व गुन्हे शोध पथक असे घटनास्थळी जावुन पाहणी करुन आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही कॅमेरे पाहीले असता एक ईसम दिनांक 20.11.2023 रोजी चे मध्यरात्री 01.30 वा चे सुमारास सदर घराचे दिशेने जात असताना व घरासमोरील दरवाज्या समोर फिरताना दिसले. त्यावरुन ईतर आजुबाजुचे कॅमेरे चेक केले असता त्याच प्रकारचा पेहराव असलेला ईसम रेंजर सायकलीवर समोर हँडलला दोन पिशव्या लटकावुन जात असताना दिसला. त्यानंतर फिर्यादी हे तिरुपती येथुन नांदेड येथे घरी आल्यानंतर त्यांनी दिनांक 24/11/2023 रोजी पोलिस स्टेशन शिवाजीनगर येथे येवुन फिर्याद दिल्यावरुन गुन्हा रजिस्टर क्र. 420/2023 कलम 454,457,380 भादंवि चा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हा उघडकीस आणने करीता वरिष्ठांनी आदेशीत केल्याने  मोहन भोसले, पोलिस निरीक्षक, पो.स्टे शिवाजीनगर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी दाखल गुन्ह्याच्या घटनास्थळावर व ईतर आजुबाजुचे लोकांना विचारपुस करुन संशयीत इसमाचे कपडे, डोक्याला बांधलेला पांढरा दुपट्टा, त्याची चालन्याची विशिष्ट पद्धत तसेच त्याने वापरलेल्या रेंजर सायकलीवरुन व केवळ ह्युमन ईंटेलिजन्स च्या आधारावर सदरचा गुन्हा कशोशीने तपास करुन 12 दिवसात उघडकीस आणला. गोपनीय माहीतीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी  राजु बाबुराव गायकवाड वय 34 वर्ष, व्यवसाय मजुरी, रा. मेहबुबनगर, नांदेड यास ताब्यात घेवुन सखोल चौकशी करुन गुन्ह्यातील गेला माल बाबत विचारपुस केली असता आरोपीने गुन्हा केल्याचे कबुल करुन त्याचे ताब्यातुन गुन्ह्यातील गेला माल सोन्याचे दागीने 1) पाटल्या 5 तोळे, 2) बांगड्या 5 तोळे पैकी 2.5 तोळे, 3) तोडे 5 तोळे, 4)नेकलेस (कानातल्या सोबत) 4 तोळे 5) मिनीगंठन 2 तोळे 6) विनले सोन्याचे 1 तोळे, 7) गळ्यातील साखळी 2 तोळे, 8) ओम चैन 6 ग्रॅम, 9) तिन अंगठ्या 1 तोळा, 10) मंगळसुत्र 1.5 तोळे, 11) गंठन 5 तोळे,
12) कर्नफुल 4 ग्रॅम असा 32.5 तोळे पैकी 30 तोळे सोन्याचे दागीने आजच्या किंमती प्रमाणे एकुण किंमती 15,00,000/- रुपये व चांदीचे घुंगराचे पैंजन 5 तोळे किंमती 3000 रुपये असा एकुण किंमती 15.03,000 रुपये चे दागीने व गुन्ह्यात वापरलेली रेंजर सायकल किं. अं 7000/- रुपये असा एकुण 15, 10,000/- रुपये चा मुद्देमाल आरोपी कडुन जप्त करण्यात आला आहे
सदरची कामगीरी  श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस अधीक्षक नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलिस अधीक्षक नांदेड, सुरज गुरव, उप विभागीय पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली  मोहन
भोसले, पोनि पोस्टे शिवाजीनगर व गुन्हे शोध पथक प्रमुख मिलींद सोनकांबळे, पोलिस उप निरीक्षक,पोहेकॉ रविशंकर बामणे, पोकॉ देवसिंग सिंगल, शेख अझहर लिंबाजी राठोड, अंकुश लंगोटे, दत्ता वडजे, बाळकृष्ण मुरकुटे यांनी पार पाडली.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!