
विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीतील खुनाचा उलगडा करण्यात नांदेड पोलिसांना यश…
नांदेड(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस ठाणे विमानतळ हद्यीमध्ये दिनांक 12/11/2023 रोजी एम जी एम कॉलेज समोर,
येथे
भरत हरीसिंग पवार रा विस्तारीत नाथनगर, नांदेड


याचा खुना झाला होता. सदर इसमाचा खुन हा भावाच्या बदला घेण्याचे उद्येशाने आरोपी नामे

विश्वास परमेश्वर शिंदे रा. एमजीएम कॉलेजजवळ, नांदेड

व त्याचे साथीदारांनी मिळुन खंजरने भोसकुन केला होता. त्यावरुन पोलीस ठाणे विमानतळ गुरनं. 375/2023 कलम 302, 34 भा.द.वि सहकलम 4/25 शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवुन अटक करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस अधीक्षक, नांदेड यांनी पोलिस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन आरोपीचा शोध घेणे चालु केले होते. दिनांक 15/11/2023 रोजी स्थागूशा चे पथकास गूप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, नमुद गुन्हा करणारा आरोपी व गुन्हयातील त्याचे साथीदार हे भोकर फाटा, अर्धापुर शिवार जि नांदेड येथे असल्याबाबत माहीती मिळालेने त्यांनी तशी माहीती वरीष्ठांना देवुन स्थागुशा चे पथकाने सापळा रचुन आरोपी
1) विश्वास परमेश्वर शिंदे वय 21 वर्ष रा. वटफळी ता. हदगाव जि नांदेड ह. मु. शारदानगर, नांदेड
2) शिवम पि. दत्तराव अंभोरे वय 19 वर्ष रा. जरोडा ता. कळमनुरी जि. हिंगोली
यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. नमुद आरोपीतांना पोलिस ठाणे विमानतळ येथे गुन्हयाचे तपासकामी देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस अधीक्षक, नांदेड, अबिनाश कुमार,अपर पोलिस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलिस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, उदय खंडेराय, पो. नि. स्थागूशा नांदेड, सपोनि पांडुरंग माने, पोउपनि दत्तात्रय काळे, आशिष बोराटे, पोहवा गंगाधर कदम, बालाजी तेलंग, पोकॉ मोतीराम पवार, तानाजी येळगे, रणधीर राजबन्सी, चालक पोकॉ/हेमंत बिचकेवार स्थागुशा, नांदेड यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे पोलिस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.


