
घरफोडीचा गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासाचे आत लावला छडा,मुद्देमालासह आरोपींना घेतले ताब्यात….
उपनगर पोलिस ठाणे येथे नोंद असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासाचे आत केला उघड, 3 लाख 76 हजार 107 रुपये किमतीची सोन्याचांदीचे दागिने केले हस्तगत…
नंदुरबार(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,उपनगर पोलिस ठाणे हद्दितील दि.19/07/2025 रोजी फिर्यादी बापुराव मराठे, रा. प्लॉट नं. 9अ गोविंदनगर, ता.जि. नंदुरबार यांनी पोलिस स्टेशन उपनगर येथे तक्रार दिली की कोणीतरी अज्ञात ईसमाने त्यांचे घरातील किचन रुमचा दरवाजा उघडून घरात प्रवेश करुन घरातील बेडरुममधील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली उपनगर पोलिस ठाणे येथे अज्ञात आरोपी विरुध्द गु.र.नं.210/2025 भा. न्या. संहिता कलम 305 (अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.


सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरु असतांना दिनांक 20/07/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक. हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नंदुरबार शहरातील सराफ बाजारातील आई एकविरा ज्वेलर्स येथे दोन इसम हे पिवळया धातूचे दागिने विक्री करण्याकरीता आले आहेत, अशी खात्रिशीर बातमी मिळालेवरुन पोलिस अधिक्षक श्रवण दत्त.एस यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला खात्री करुन कारवाई कामी रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने नंदुरबार शहरातील सराफ बाजारातील आई एकविरा ज्वेलर्स येथे जाऊन मिळालेल्या बातमीप्रमाणे पाहता तेथे दोन अनोळखी संशयित इसम मिळुन आले. त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे अनुक्रमे ।. गणेश धनराज सुर्यवंशी, वय 25 वर्षे, रा.हुडको कॉलनी, नंदुरबार 2. दिपक नारायण कदमबांडे, वय 34 वर्षे, रा. जगतापवाडी, ता.जि. नंदुरबार असे सांगितले. त्यांना गुन्हयाबाबत विचारपुस करता ते असंबंध्द अशी उत्तरे देऊ लागले. सदर ठिकाणी त्यांची अंगझडती घेता त्यांचे ताब्यात रोख 1,50,000/- रुपये मिळुन आले.

त्यांना सदर रोख रकमेबाबत विचारणा करता त्यांनी आई एकविरा ज्वेलर्स दुकानाचे मालक 3. दिपक सदाशिव विसपुते, वय 30 वर्षे, रा. बाबा गणपती जवळ, नंदुरबार (चोरीचा माल घेणारा) यास सोन्याचे दागिने विक्री करुन त्याचे मोबदल्यात दुकान मालकाने 1,50,000/- रुपये रोख रक्कम दिली. त्यावरुन सदर ज्वेलर्स दुकानात झडती घेता वर नमुद इसमांनी दिलेल्या सोन्याची चैन व पेंडल दुकानात मिळून आले. सदर सोन्याचे दागिन्यांबाबत दोन्ही ताब्यातील इसमांना विचारपुस करता त्यांनी सांगितले की, त्यांचेकडील सोन्याचे दागिने गणेश सुर्यवंशी याचा चुलत भाऊ 4. जयेश देविदास सुर्यवंशी, वय-24 वर्षे, रा. नगरपालिका शाळा क्रमांक । जवळ, नंदुरबार याने व त्याचा साथीदार 5. दिपक सचिन पवार,वय- 25 वर्षे, रा. मनमोहन नगर, नंदुरबार अशांनी विक्री करण्यासाठी दिले असल्याचे सांगितले. वर नमुद इसमांकडुन 21.360 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे किंमत 02,02,920/- रुपये तसेच 1,50,000/- रुपये रोख रक्कम असे हस्तगत करण्यात आले. त्याचप्रमाणे नमुद आरोपींचे साथीदार जयेश सुर्यवंशी व दिपक पवार यांचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाकडून शोध घेण्यात येऊन त्यांना शहरातील द्वारकाधीश मंदिराजवळ ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यांचेकडून एकुण 23,187/- रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

त्याअन्वये वर नमुद आरोपीकडुन एकुण 03,76,107/- रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असे हस्तगत करण्यात आले असुन उपनगर पोलिस ठाणे गुरनं. 210/2025 हा गुन्हा 24 तासांचे आत उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलिस अधिक्षक. आशित कांबळे, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पोलिस उपनिरीक्षक मुकेश पवार,पोहवा विशाल नागरे, राकेश मोरे नापोशि मोहन ढमढेरे, पोशि/अभय राजपुत, आनंदा मराठे, राहूल तडवी यांनी केली आहे.


