कुख्यात गुंड शेख शहबाज उर्फ बबलु काल्या यांचेवर पोलिस अधिक्षक श्रवण दत्त यांची स्थानबध्दतेची कार्यवाही….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

दंगा करणारा, आक्षेपार्ह पोस्ट करणारा कुख्यात आरोपी शेख शहेबाज शेख शरफुद्दीन ऊर्फ बबलू काल्या यास MPDA कायद्यान्वये एक वर्षासाठी केले स्थानबद्ध,जिल्हा प्रशासनाची कारवाई, गुन्हेगारांवर विशेष नजर …

नंदुरबार(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सराईत आरोपी शेख शहेबाज शेख शरफुद्दीन ऊर्फ बबलू काल्या हा पोलिस ठाणे हद्दीत दंगा घडवुन शासकीय नोकरावर हल्ला करणे, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, चोरी करणे, जिल्हाधिकारी यांचे मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, तसेच सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट करुन दोन समाजात तेढ निर्माण होईल अशाप्रकारचे गंभीर गुन्हे असे एकुण 07 गुन्हे ज्याच्यावर नोंद आहे





सदरहु आरोपी शेख शहेबाज शेख शरफुद्दीन ऊर्फ बबलू काल्या, वय 33 वर्षे, रा. अली साहाब मोहल्ला, जि. नंदुरबार यास एक वर्षासाठी एम.पी.डी.ए. अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील गुन्हेगारांचे वर्तणुकीत सुधारणा होत नसलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कडक कारवाईचा बडगा नंदुरबार जिल्हा पोलिस अधिक्षक  श्रवण दत्त. एस यांचेकडुन उचलला जात आहे.



सदर स्थानबद्ध प्रस्तावास मा. जिल्हाधिकारी, नंदुरबार श्रीमती मिताली सेठी यांचेकडून मंजुरी मिळताच आरोपी शेख शहेबाज शेख शरफुद्दीन ऊर्फ बबलू काल्या, वय 33 वर्षे, रा. अली साहाब मोहल्ला, जि. नंदुरबार यास शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक  अमितकुमार मनेळ यांचे पथकाकडून जिल्हयातुन स्थानबद्ध करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!