नाशिक शहरात विक्रीकरीता येणारे गोंमासाचे वाहन गुन्हे शाखा युनीट१ ने केले जेरबंद…
गोवंशीय जनावंराची कत्तल करून गोमांसाची विक्री करीता वाहतुक करणारे इसम गुन्हे शाखा युनीट १ ने केले जेरबंद…
नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
पोलिस आयुक्त संदीप कर्णीक,पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव,सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे शाखा सिताराम कोल्हे
यांनी अवैधरित्या गोमांस वाहतुक / विक्री करणा-या इसमांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करणे बाबत सक्त सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने दि. २८/०१/२०२४ रोजी युनिट १, नाशिक शहर कडील पोलिस शिपाई मुक्तार शेख, आप्पा पानवळ यांना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, संगमनेर येथुन एक इसम गोवंशीय जनावंराची कत्तल करून त्याचे मांस विक्री करण्याकरीता त्याचे महिंद्रा पिकअप गाडीतुन मुंबईनाका
पोलिस ठाणे हद्दीतील खोडेनगर येथे विक्री करीता येणार आहे. त्यावर पहाटे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि चेतन श्रीवंत,नापोशि मिलींदसिंग पदरेशी, पोशि मुक्तार शेख,आप्पा पानवळ, राजेश राठोड, नितीन जगताप,
जगेश्वर बोरसे, पोअं/२१५४ राहुल पालखेडे, चासपोउनि / किरण शिरसाठ अशा पथकाने खोडेनगर येथे सापळा लावुन महीन्द्रा कंपनीची पिकअप क्रमांक एम. एच. १४ डी. एम. ३००६ या चारचाकी मधील इसम
१) अमीर असद कुरेशी वय २७ वर्ष रा. संगमनेर, जि. अहमदनगर.
२) सलमान इक्बाल कुरेशी वय २८ वर्ष रा. चौकमंडई भद्रकाली नाशिक
यांना खोडेनगर येथे ताब्यात घेतले. त्यावेळी त्याचे ताब्यातील महिंद्रा पिकअप मध्ये गोवंशीय जनावरांचे सुमारे ५०० किलोच्या वर मांस मिळाले. तात्काळ पशु वैदयकीय अधिकारी यांना बोलावुन सदर गोंमांसाची तपासनी करून ताब्यात घेतले. आरोपी क्र १ अमीर असद कुरेशी हा सदरचे मांस आरोपी क्र २ सलमान इक्बाल कुरेशी याचेकडे आणुन देत व आरोपी क्र २ सलमान इक्बाल कुरेशी हा
मुंबईनाका, भद्रकाली, वडाळागाव येथील किरकोळ मटन विक्री दुकानात देई व दुकानात सदर मांस चोरून विक्री होत होते असे निष्पन्न झाले. त्यावर पंचनामा करून वाहनासह एकुण ८,७५,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेवुन दोन्ही आरोपीविरुध्द प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५, ५ अ, ९ व ११ अन्वये मुंबईनाका पोलिस ठाणे येथे फिर्याद देवून त्यांना मुद्देमालासह मुंबईनाका पोलिस ठाणेचे ताब्यात पुढील कारवाईकामी देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदीप कर्णीक, प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, गुन्हेशाखा, डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १ नाशिक शहर कडील पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, पोउनि चेतन श्रीवंत,नापोशि मिलींदसिंग पदरेशी,मुक्तार शेख, आप्पा पानवळ, राजेश राठोड, नितीन जगताप,जगेश्वर बोरसे, राहुल पालखेडे, विलास चारोस्कर, चासपोउनि / किरण शिरसाठ यांनी केलेली आहे.