ॲमेझॅान गोडाऊन मधे चोरी करणाऱ्यास युनीट १ ने केले जेरबंद…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

ॲमेझोन कंपनीच्या गोडावुन मधुन चोरी करणारा इसम जेरबंद
गुन्हे शाखा युनिट क्र. १ नाशिक शहरची कामगिरी…

नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि-(८) रोजी पहाटे ०२:०० ते ०५:०० वा. च्या दरम्यान अशोका मार्गा वरील ॲमेझोन कंपनीच्या गोडावुन मधुन कुनीतरी अज्ञाताने कॅश रूमची चावी घेवुन सेफ कस्टडी चे लॉकर उघडुन त्यातील ८,५७,०००/- रूपये ची रक्कम काढुन चोरी करून त्या बाबत मुंबईनाका पोलिस ठाणे येथे ७८ / २०२४ भादवि कलम ३८१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणनेबाबत पोलिस आयुक्त नाशिक शहर  संदीप कर्णीक यांनी सुचना दिल्या होत्या, त्या अनुषगांने  पोलिस उपायुक्त  प्रशांत बच्छाव, सहा. पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते.
त्याअनुषंगाने गुन्हेशाखा युनिट ०१ कडील पथकाने सातत्याने तपास करून गुन्हा घडला परिसरातील सिसिटिव्ही फुटेज तपासुन व तांत्रीक विश्लेषणव्दारे गुन्हा करणारा तिथेच काम करणारा सुरक्षा रक्षक असल्याचे निष्पन्न झाले आरोपीची गोपनीय बातमीदारा मार्फत ओळख पटविली होती. त्यावर सदर आरोपीचे नाव आदिल सैय्यद असे असल्याचे निष्पन्न केले होते. तो गोसावी वाडी परिसरात येणार असल्याची माहीती पोशिराजेश राठोड यांना मिळाल्या वरून गुन्हे शाखा युनिट – १ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक  मधुकर कड यांचे
मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक चेतन श्रीवंत, सफौ सुगन साबरे, पो.हवा देविदास ठाकरे, शरद सोनवणे, पोशि आप्पा पानचळ, राजेश राठोड, अमोल कोष्टी, चालक समाधान पवार यांनी गोसावी वाडी परिसारात सार्वजनीक शौचालया जवळ सापळा लावुन इसम नामे आदिल जमील सैय्यद वय- ३८ रा. अंजुनम उर्दु शाळे जवळ, गोसावी वाडी, नाशिकरोड, नाशिक यास शिताफीने पकडुन ताब्यात घेतले. त्याचे कडे चौकशी केली असता, त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथीदार रामदास संतु टेमगर रा. विहीत गाव, नाशिक याचे सह केल्याची कबुली देवुन गुन्हयातील चोरी केलेली रक्कम पैकी १,००,०००/- रूपये रोख व ०१ मोबाईल असा एकुण १,१५,०००/- रूपये चा मुददेमाल त्याचे कब्जातुन हस्तगत
केला आहे.
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव,सहा. पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ
पोलिस निरीक्षक मधुकर कड, सपोनि  हेमंत तोडकर, पोलिस उप निरीक्षक चेतन श्रीवंत,सफौ सुगन साबरे, पो.हवा देविदास ठाकरे, शरद सोनवणे, पोशि आप्पा पानचळ, राजेश राठोड, अमोल कोष्टी, चालक समाधान पवार यांनी संयुक्त रित्या केलेली आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!