
सराईत मोटारसायकल चोरटे गुन्हे शाखा युनीट २ च्या ताब्यात,९ मोटारसायकल केल्या हस्तगत…
नाशिक शहर पोलिस गुन्हे शाखा युनीट २ ने मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे केले उघड, ७,१०,०००/- रूपये किंमतीच्या ०९ मोटार सायकल केल्या जप्त…..
नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक शहरात व परिसरात दैनंदिन घडणा-या मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्याचे दृष्टीने उपाययोजना करणे व आळा घालणे बाबत पोलिस आयुक्त संदिप कर्णिक,पोलिस उपायुक्त, गुन्हे प्रशांत बच्छाव, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हे डॉ. सिताराम कोल्हे यांनी गुन्हेशाखेला आदेश दिलेले आहेत.
त्याअनुषंगाने दि (२८) रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील पोहवा गुलाब प्रभाकर सोनार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली
पोउनि प्रसाद रणदिवे, पोहवा गुलाब सोनार, विजय वरंदळ, सुहास क्षिरसागर, नंदकुमार नांदुर्डीकर,चंद्रकांत गवळी,राजेंद्र घुमरे,सुनिल आहेर, प्रकाश महाजन,अतुल पाटील,पोशि संजय पोटींदे अशांनी तांत्रीक विश्लेषण शाखा यांचे मदतीने सापळा रचून कार्यवाही
केली असता इसम नामे दिपक अशोक जाधव, वय ३४ वर्षे, रा. कनाशी ता. कळवण जि. नाशिक हा त्याचे ताब्यात दोन चोरीच्या मोटार सायकल बाळगून मिळून आला सदरच्या मोटार सायकल त्याच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आल्या. तसेच सखोल तपासात सचिन पंढरीनाथ मोरे, वय २३ वर्ष, रा. सध्या रा. रामलिंग, ता शिरूळ, जि. पुणे, मुळ रा.मुपो. कनाशी, ता. कळवण, जि. नाशिक हा देखील त्याचेकडे चोरीच्या ४ मोटार सायकल बाळगून मिळून आला. सदरच्या चोरीच्या मोटार सायकल त्यांनी आरोपी नामे योगेश दाभाडे, रा. नामपुर ता.सटाणा जि.नाशिक याचेकडून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर मोटार सायकल चोरीचे सरकारवाडा पोलिस स्टेशन.-२,म्हसरूळ पोलिस स्टेशन – १, भद्रकाली पोलिस स्टेशन – ०१, पश्चिम देवपुर पोलिस स्टेशन – १, सटाणा पोलिस स्टेशन १ असे गुन्हे उघडकीस आणून ५,३०,०००/- रूपयांचा मुद्येमाल हस्तगत करण्यात गुन्हे शाखा युनिट २ ला यश
आले आहे.
तसेच पाथर्डीफाटा येथील मुंबई आग्रा महामार्ग उड्डान पुलाखाली विना नंबरप्लेट असलेल्या तीन मोटार सायकली बेवारसरित्या पार्क असल्या बाबत माहिती मिळाल्याने गुन्हे शाखा युनिट-२ कडील अधिकारी, अंमलदार यांनी तिचे चेसीस व इंजि नंबरवरून खात्री केली असता मोटार सायकली चोरी बाबत सरकारवाडा पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल असल्याचे आढळून आल्याने १,८०,०००/- रूपयांचा मुदेदमाल मोटार सायकल सरकारवाडा पोलिस स्टेशनला जमा करून गुन्हे उघडकीस आणण्याची उत्कृष्ठ कामगिरी केली आहे.सदरचे गुन्हे उघडकीस आणून २ आरोपी ताब्यात घेवून ७,१०,०००/- रू. चा मुद्देमाल हस्तगत केला
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उप आयुक्त, गुन्हे प्रशांत बच्छाव, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हे डॉ.सिताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट २ कडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, सपोनि. सचिन जाधव, पोउनि श्री प्रसाद रणदिवे, गुलाब सोनार, सपोउनि श्रीराम सपकाळ, बाळु शेळके, पोहवा.विजय वरंदळ,सुहास क्षिरसागर, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, राजेंद्र घुमरे, सुनिल आहेर, प्रकाश महाजन,वाल्मीक चव्हाण, विशाल पाटील, अतुल पाटील, शंकर काळे,पोशि संजय पोटींदे,तेजस मते, जितेंद्र वजीरे अशांनी तांत्रीक विश्लेषण शाखा यांचे मदतीने केली आहे.




