
खंडणी न दिल्याने गोळीबार करणाऱ्यास गुंडा विरोधी पथकाने केले जेरबंद….
खंडणीचे पैसे न दिल्याने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करणाऱ्या फरार आरोपीतास गुंडा विरोधी पथकाने केले जेरबंद…


नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२४) एप्रिल २०२४ रोजी यातील तक्रारदार ज्ञानेश्वर प्रकाश मानकर यांना चाडेगाव येथील हॉटेल मध्ये रात्रीच्या वेळी यातील आरोपी सचिन मानकर व त्याचे साथीदारांनी मिळुन ज्ञानेश्वर मानकर यांचेकडे जबरदस्तीने २०,००० /- रु खंडणी स्वरुपात मागितले असता ज्ञानेश्वर मानकर यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी सचिन
मानकर याने ज्ञानेश्वर यांना मारहान करुन तुला आता ठार करतो असे म्हणुन त्याचे कंबरेला लावलेला गावठी कट्टा काढून दोन वेळा फिर्यादी यांच्या दिशेने गोळीबार केला असता त्यापैकी एक गोळी फिर्यादी यांचे पाठीमध्ये लागली यावरुन दिनांक २५/०४/२०२४ रोजी नाशिकरोड पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर २३८ / २०२४ भादंवि क ३०७, ३८७, ३२३, ५०४, ५०६, ३४, आर्म अॅक्ट ३ / २५ सह मपोका १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला

सदर गुन्ह्याचे स्वरुप बघता गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्याकरिता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडा विरोधी पथकास आदेशीत केले होते त्यानुसार पोलिस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, पोलिस आयुक्त (गुन्हे)संदीप मिटके यांनी गुंडा विरोधी पथकास सुचना देवुन मार्गदर्शन केले होते

सदर गुन्हयातील पाहिजे असलेला आरोपी सचिन मानकर हा पाथर्डी गाव परिसरात असल्याबाबत गुंडा विरोधी पथकाला माहिती मिळाली असता सदरची माहिती गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सपोनि ज्ञानेश्वर मोहिते यांना देवुन पोउनि मलंग गुंजाळ पोलिस अंमलदार विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, प्रविण चव्हाण, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत असे पथक तयार करुन आरोपींचा शोध घेणेकरीता रवाना केले. गुंडा विरोधी पथकाने आरोपी सचिन मानकर यास पकडण्यासाठी पाथर्डी गाव परिसरात सापळा लावला असता आरोपींचा हॉटेल वालदेवी जवळ, पाथर्डी गाव, नाशिक येथे पाठलाग करुन आरोपी सचिन आनंदा मानकर वय – ३९ वर्षे, रा. चाडेगाव, मानकर मळा, सामनगाव रोड, नाशिक यास शिताफीने ताब्यात घेवुन त्यास पुढील तपास कामी नाशिकरोड पोलिस स्टेशन, नाशिक शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णीक,पोलिस आयुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलिस उप निरीक्षक मलंग गुंजाळ, विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, प्रविण चव्हाण, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, डी. के. पवार, राजेश सावकार, सुनिल आडके, नितीन गौतम, निवृत्ती माळी यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.


