ईंदिरानगर हद्दीतील खुनाचा काही तासाचे आत ईंदीरानगर पोलिसांनी केला उलगड…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

इंदिरानगर पोलिस स्टेशन हददीत घडलेल्या खुनाच्या गुन्हयाची काही तासाचे आत केला उलगडा….

नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२३) सप्टेंबर २०२४ रोजी फिर्यादी श्री शशिकांत रामदास गांगुर्डे रा. विल्होळी ता. जि. नाशिक यांनी फिर्याद दिली की, काल दिनांक २२/०९/२०२४ रोजी त्यांचा भाचा नावे नटेश विजय साळवे वय २० वर्षे, रा. संघर्ष नगर, विल्होळी, ता. जि. नाशिक याचा जुन्या वादाच्या करणावरून १) दुर्गेश दिपक शार्दुल २) आयुष उर्फ यश विजय दोंदे ३) रोहित रामदास वाघ ४) गौरव रविंद्र दोंदे ५) करण पंकज भांबळ वय २० वर्षे, ६) प्रफुल्ल अमोल दोंदे नाशिक यांनी  मंडळी जमवुन धारदार शस्त्राने वार करून जिवे ठार मारले यावरुन फिर्यादी श्री शशिकांत रामदास गांगुर्डे दिल्याने इंदिरानगर पोलिस स्टेशन गुरनं गुरनं. २९८/२०२४ भा न्या संहिता २०२३ चे कलम १०३ (२), १८९(२), १९१(२) (३), १९० मपोका कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.



सदरचा प्रकार घडल्यानंतर पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांचे आदेशाने सदर गुन्हयाचा तपास करीत असतांना इंदिरानगर पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन ईंदीरानगर मधील अधिकारी व कर्मचारी यांना सदर गुन्हयातील आरोपी हे गौळाणे ता. जि. नाशिक परिसरात लपलेले असलेबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत शिताफिने सापळा लावुन सदर गुन्हयातील आरोपींना ताब्यात घेवुन इंदिरानगर पोलिस स्टेशनला आणुन त्यांचेकडे चौकशी केली असता आरोपींचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने आरोपी १) दुर्गेश दिपक शार्दुल वय २३ वर्षे, २) आयुष उर्फ यश विजय दोंदे वय १९ वर्षे, ३) रोहित रामदास वाघ वय २० वर्षे, ४) गौरव रविंद्र दोंदे वय १९ वर्षे, ५) करण पंकज भांबळ वय- २० वर्षे, ६) प्रफुल्ल अमोल दोंदे वय २० वर्षे, सर्वे रा. पाथर्डीगाव, नाशिक यांना अटक करण्यात आली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि भुषण सोनार करित आहेत.



सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,पोलिस उप आयुक्त(परीमंडळ २) मोनिका राऊत,पोलीस उपआयुक्त (गुन्हे),  प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त, अंबड विभाग, शेखर देशमुख, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके, सहा पोलिस आयुक्त, नाशिकरोड विभाग सचिन बारी यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक इंदिरानगर पोलिस स्टेशन अशोक शरमाळे, सपोनि सुनिल अंकोलीकर, सपोनि भुषण सोनार, पोउपनि धनराज पाटील, परिपोउनि संतोष फुंदे,सफौ गांगुर्डे, पोहवा अमजद पटेल,नापोशि सागर परदेशी, पोशि सचिन रहाणे,मुश्रीफ शेख,योगेश जाधव, मुजाहिद सैय्यद, सागर कोळी,चंद्रभान पाटील, जयलाल राठोड, सौरभ माळी,अमोल कोथमीरे, संतोष कोरडे,मंगेश आव्हाड, मपोशि शामल जोशी यांनी केली









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!