नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने २४ तासात उघड केला गुन्हा,४ आरोपींना केले जेरबंद…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

म्हसरूळ हद्दीतील खुनाचा गुन्हा अवघ्या २४ तासामध्ये युनीच १ ने केला उघड, ४ आरोपी केले जेरबंद….

नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीत दि (१६) रोजी यातील फिर्यादी योगेश अशोक तोडकर, वय – ३४वर्षे, रा-हेकरेचाळ रामवाडी आदर्शनगर पंचवटी नाशिक यांनी अनोळखी इसमांनी अज्ञात कारणावरून त्यांचा भाऊ मयत प्रशांत तोडकर याचा खुन केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलिस ठाणे नाशिक शहर येथे 1 गुरनं १५३ / २०२३ भादवि कलम ३०२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.





सदर गुन्हयाचे अनुषंगाने  पोलिस उपायुक्त(गुन्हे)प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त, गुन्हे संदीप मिटके यांनी घटनास्थळी भेट देवुन गुन्हयातील आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत म्हसरूळ पोलिस ठाणे व गुन्हेशाखेचे पोलिस पथक यांना सुचना देवुन मार्गदर्शन केले होते.त्यानुसार  गुन्हे शाखा युनिट १ चे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना सी.सी.टी.व्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे व गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे  आरोपींचे नावे निष्पन्न करुन. सदर आरोपी यांचा शोध घेत असतांना पोउपनि रविंद्र बागुल, नापोशि प्रशांत मरकड,पोशि विशाल चारोस्कर अशांना त्यांच्या गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील पाहिजे असलेले आरोपी हे पिंपरी चिंचवड भागात फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली



सदरची बातमी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना दिली असता त्यांनी सपोनि  हेमंत तोडकर, पोउपनि रविंद्र बागुल, पोहवा  प्रविण वाघमारे,विशाल काठे,नाझीमखान पठाण,नापोशि  विशाल देवरे, चासफौ किरण शिरसाठ यांचे पथक तयार करून
वरिष्ठांचे परवानगीने आरोपींचा शोध घेण्याकामी  पिंपरी चिंचवड येथे रवाना केले. नमुद पथकाने आरोपी यांचा पिंपरी चिंचवड गुन्हेशाखा युनिट क्र २ चे मदतीने आरोपी यांचा शोध घेतला असता आरोपी यांना थरमॅक्स चौक, निगडी पुणे येथे सापळा लावुन ताब्यात घेवुन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नावे १) विजय दत्तात्रय आहेर, वय ३० वर्षे, रा-रामवाडी पंचवटी नाशिक, २) संकेत प्रदिप गोसावी, वय-२६वर्षे, रा-जुईनगर म्हसरूळ पंचवटी
नाशिक, ३) प्रशांत निंबा हादगे, वय-२९वर्षे, रा- पेठरोड मेहरधाम, पंचवटी नाशिक, ४) कुणाल कैलास पन्हाळे,वय – ३० वर्षे, रा- मायको दवाखान्याच्या पाठीमागे दिंडोरीरोड पंचवटी, नाशिक असे सांगीतले यांना ताब्यात घेवुन त्यांना वरील गुन्हयाचे बाबत विचारपुस केली असता त्यांनी विजय आहेर व मयत प्रशांत तोडकर यांच्यात काही दिवसापुर्वी झालेल्या शाब्दीक वाद झाला होता दिनांक १५/०६/२०२४ रोजी शाब्दीक वादाचे रूपांतर भांडणात झाले म्हनुन विजय आहेर याने प्रशांत तोडकर यांच्या डोक्यात दगड घालुन खुन केला असल्याची हकीगत सांगुन गुन्हयाची कबुली दिल्याने सदर गुन्हा उघडकीस आला आहे.सर्व आरोपींना पुढील
तपासकामी म्हसरूळ पोलिस ठाणे यांचे ताब्यात दिले आहे.



सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त,गुन्हेशाखा, संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट १ चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, पोउपनि चेतन श्रीवंत,रविंद्र बागुल, पोहवा विशाल काठे, प्रविण वाघमारे, नाझिमखान पठाण, महेश साळुंके, धनंजय शिंदे
नापोशि प्रशांत मरकड, विशाल देवरे, पोशि विलास चारोस्कर, जगेश्वर बोरसे,चासफौ किरण शिरसाठ यांनी केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!