
पंचवटी परीसरात दहशत माजविणारे गुन्हे शोध पथकाने घेतले ताब्यात..
दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने हातामध्ये लाकडी दांडके, कोयते घेवुन वाहनांची तोडफोड करणारे गुन्हेगार पंचवटी पोलिसांचे गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात…
नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन पंचवटी यांना प्रसंगी रिक्षामधे प्रवास करत असलेले तक्रारदार सागर शांतीलाल फुलमाळी हे दि(२१) मे चे रात्री ०३:३० ते ०३ : ४५ वा. चे दरम्यान वज्रेश्वरी, पाटाजवळ, दिंडोरीरोड, नाशिक येथे रिक्षा मध्ये बसलेले असतांना, दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने लामखेडे मळयाकडुन एक इनोव्हा गाडी जोरात रिक्षाजवळ येवुन इनोव्हा कारमधुन ५ ते ६ इसम हातात लाकडी दांडके, कोयते घेवुन खाली उतरून ते सर्व अनोळखी इसम यांनी तक्रारदार रिक्षात बसलेला असतांना रिक्षाची समोरील काच फोडुन, पाठीमागील बाजुचे हुडवर, डावे बाजुस व उजवे बाजुने कोयत्याने व दांडक्याने वार केले, त्याचे कृत्यामुळे सदरचे वार तक्रारदार यांना लागले असते तर त्यांचा जिव गेला असता. तसेच सदर रिक्षाचे बाजुला असलेल्या इको गाडीच्या सर्व काचा फोडल्या, रिक्षाची समोरील काच फोडली, आयसर टेम्पोची समोरील काच फोडली,
ॲपे रिक्षाची काच फोडली, अॅक्टिव्हा गाडीवर लाकडी दांडयाने मारून नुकसान केले. तसेच कुमावत नगर येथील रिक्षाचे देखील नुकसान केले.सदर बाबत तक्रारदार सागर शांतीलाल फुलमाळी यांचे तक्रारीवरून पंचवटी पोलिस ठाणे येथे गु.रन ३२८/२०२४ भा.दं.वि. कलम ३०८, ४२७, १४३, १४४, १४७, १४८, १४९ मपोकाक. १३५ सह क्रिमिनल लॉ अमेंडमेन्ट अॅक्ट १९३२ कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता


सदरचा गुन्हा अतिशय संवेदनशिल असल्याने गुन्हयातील अज्ञात आरोपीचा तात्काळ शोध घेऊन सदरचा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणणेबाबत पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त,परी १ किरणकुमार चव्हाण यांनी आदेशीत केले होते

त्याअनुषंगाने पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचे मार्गदर्शनाखाली पंचवटी गुन्हे शोध पथकाचे
अधिकारी व अंमलदार यांनी संशयीत इसमांपैकी १) गौरव एकनाथ थोरात, वय १९ वर्षे २) प्रतिक अनिल दोबाडे, वय २१ वर्षे यांना दिनांक २२/०५/२०२४ रोजी सदर गुन्हयात अटक करण्यात आली असुन ते सध्या न्यायालयीन कोठडीत मध्यवर्ती कारागृह नाशिकरोड, नाशिक येथे आहेत. सदर आरोपीतांकडे केलेल्या तपासावरून गुन्हयात पाहिजे असलेले साथीदार १) नितेश प्रल्हाद
राऊत, वय २४ वर्षे, रा अपेक्षा सोसा.आरटीओ कॉर्नर, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक, २) चेतन भिकाजी गायकवाड, वय १८
वर्षे, राह. अश्वमेधनगर, पेठरोड, नाशिक यांना दि.२७/०५/२०२४ रोजी अटक करण्यात आली आहे. तसेच यातील ३) अविनाश
प्रल्हाद राऊत, वय २० वर्षे, राह. अपेक्षा सोसा., आरटीओ कॉर्नर, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक यास दिनांक २८/०५/२०२४ रोजी
अटक करण्यात आली आहे. त्यांना दिनांक २९/०५/२०२४ पर्यंत पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली असुन त्यांचेकडे
अधिक सखोल तपास सुरू आहे.सदर गुन्हयात एका विधी संघर्षित बालकाचा देखील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेऊन बाल सुधार गृह येथे दाखल करण्यात आले आहे.

सदरची उल्लेखनिय कामगिरी ही पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त,परी १ किरणकुमार चव्हाण, सहा पोलिस
आयुक्त,पंचवटी विभाग नितीन जाधव,वपोनि मधुकर कड, पंचवटी पोलिस ठाणे,पोनि. प्रशासन नंदन बगाडे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि विलास पडोळकर, सफौ. संपत जाधव, पोहवा अनिल गुंबाडे,सागर कुलकर्णी, दिपक नाईक, महेश नांदुर्डीकर,नापोशि संदिप मालसाने,निलेश भोईर, राकेश शिंदे, जयवंत लोणारे, कैलास शिंदे, पोशि घनश्याम महाले, वैभव परदेशी, नितीन पवार, अंकुश काळे, गोरख साबळे, कुणाल पचलोरे, युवराज गायकवाड यांनी पार पाडली आहे.


