नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने पाच तासाचे आत केला पंचवटी येथील खुनाचा गुन्हा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पंचवटी येथील खुनाचा गुन्हेशाखेच्या युनिट  १ ने  ५ तासाच्या आत केला उलगडा, आरोपीस केले जेरबंद….

नाशिक(शहर प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पंचवटी पोलिस ठाणे हद्दीत दिनांक १२ फेब्रुवारी रोजी शासनातर्फे पोउनि प्रदिप गायकवाड, नेम-पंचवटी पोलिस ठाणे, नाशिक शहर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिस ठाणे येथे । गुरनं ८३/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) प्रमाणे फिर्याद दाखल होती.





सदर गुन्हयाचे अनुषंगाने  प्रशांत बच्छाव, पोलिस उप आयुक्त, गुन्हे,  संदिप मिटके, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांनी गुन्हयातील अज्ञात आरोपीताचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत गुन्हेशाखेचे पोलिस पथक यांना सुचना देवुन मार्गदर्शन केले होते.



गुन्हेशाखा युनिट १ चे अधिकारी तसेच अंमलदार हे सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना गुन्हयाच्या घटनास्थळास तात्काळ भेट देवुन आजु बाजूचे सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी केली असता त्यामध्ये एक संशयित इसम येतांना दिसला. सदर संशयिताचा शोध घेत असतांना पोअं/२०६९ विलास चारोस्कर व पोअं/२५१२ नितीन जगताप यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सी.सी.टी.व्ही फुटेज मधील अनोळखी इसमाचे नाव संतोष अहिरे, रा-स्टेट बँकेच्या पाठीमागे एरंडवाडी, पेठफाटा पंचवटी नाशिक असे असुन त्याने एका इसमास रात्री मारहाण केली आहे तो सध्या गुलाबबाग एरंडवाडी पंचवटी भागात फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली



सदरची बातमी वपोनि मधुकर कड यांनी सपोनि हेमंत तोडकर, पोउपनि चेतन श्रीवंत यांचे मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करुन सदर पथकांनी गुलाबबाग पंचवटी नाशिक भागात जावुन सापळा लावुन शिताफीने आरोपीस ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव संतोष रमेश अहिरे, वय ३२वर्षे, रा स्टेट बँकेच्या खाली, एरंडवाडी पेठफाटा, पंचवटी नाशिक यास ताब्यात घेवुन त्यास वरील गुन्हयाचे बाबत विचारपुस केली असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने पंचवटी पोलिस ठाणे कडील । गुरनं ८३/२०२५ भा. न्या.सं. कलम १०३(१) प्रमाणे हा गुन्हा उघडकीस आला आहे. तरी आरोपीतांना पुढील तपासकामी पंचवटी पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले आहे.

सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक,पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा  प्रशांत बच्छाव,सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा संदिप मिटके नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट १ चे पोलिस निरीक्षक  मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, पोउपनि चेतन श्रीवंत, पोहवा प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे, रविंद्र आढाव, योगीराज गायकवाड, महेश साळुंके, पोना  मिलिंदसिंग परदेशी, पोशि विलास चारोरकर, राहुल पालखेडे, नितीन जगताप, जगेश्वर बोरसे, चालक श्रेणी पोउनि/किरण शिरसाठ अशांनी केलेली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!