
मिरवणुक काढुन दहशत माजविणारे गुन्हे शाखेच्या युनीट १ ने घेतले ताब्यात….
कारागृहातुन सुटल्याने मिरवणुक काढुन दहशत माजवणारा हर्षद पाटणकर यास युनीट १ ने घेतले ताब्यात…
नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त.संदिप कर्णिक यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार
पोलिस उपायुक्त(गुन्हे)प्रशांत बच्छाव,सहा पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा संदीप मिटके यांनी नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करणे बाबत सुचना दिलेल्या होत्या व त्याप्रमाणे मार्गदर्शन केले होते.


त्यानुसार दिनांक २३/०७/२०२४ रोजी बेथिल नगर ते डॉ. आंबेडकर चौक साधु वासवाणीरोड शरणपुर परिसरात हर्षद सुनिल पाटणकर व त्याचे साथीदार यांनी हर्षद पाटणकर याचेवर एम. पी. डी. ए अन्वये झालेल्या कारवाई नंतर तो कारागृहामधुन सुटल्याने हर्षद पाटणकर व त्याचे साथीदार यांनी जनमाणसात भिती निर्माण
होईल या उद्देशाने बेकादेशीर जमाव जमवुन महिन्द्रा एक्स यु व्हि गाडी क्रमांक एम.एच १५ – जी. एक्स-८७२१ व १० ते १५ मोटार सायकलवर मोठ-मोठयाने अर्वाच्च घोषणा देत हॉर्न वाजवत वाहनांची व पायी मिरवणुक काढली. म्हणुन सपोउनि सुधीर तुकाराम पाटील यांनी सरकारतर्फे फिर्यादी होवुन हर्षद पाटणकर व त्याचे साथीदार यांचे विरूध्द गुरनं १९९ / २०२४, भा. न्या. सं कलम १८९ (२), २२३ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

सदर आरोपीवर कारवाई करण्याबाबत वरिष्ठांनी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने गुन्हेशाखा युनिट क्र. १ नाशिक शहर हे पाहिजे आरोपींचा शोध घेत असतांना पोहवा प्रशांत मरकड व नापोशि मिलींदसिंग परदेशी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, हर्षद पाटणकर हा जेलमधुन मुक्त झाल्यानंतर मिरवणुकीमध्ये महिन्द्रा एक्स यु व्हि गाडी क्रमांक एम.एच १५ – जी. एक्स ८७२१ जे वाहन वापरले होते ते वाहन नरेश उर्फ पवन कसबे हा चालवित होता या बाबत माहिती मिळाली तसेच नरेश कसबे व हर्षद पाटणकर हे दोन्ही ध्रुव नगर भागात फिरत असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना देवुन त्यांनी श्रेणी पोउनि रविंद्र बागुल,पोहवा प्रविण वाघमारे, संदिप भांड, प्रदिप म्हसदे, विशाल काठे, प्रशांत मरकड, नाझीमखान पठाण, नापोशि मिलींदसिंग परदेशी, विशाल देवरे,पोशि मुक्तार शेख तसेच चालक पोशि समाधान पवार अशांचे पथक तयार केले.

नमुद पथकाने सदर गुन्हयातील पाहिजे आरोपींचा ध्रुव नगर परिसरात शोध घेतला असता ते मिळुन आल्याने त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव १) हर्षद सुनिल पाटणकर,
वय २५ वर्षे, रा-बोधलेनगर शरणपुररोड नाशिक, २) नरेश उर्फ पवन माणिक कसबे, वय – ३१ वर्षे, रा-यशराज प्राईड ध्रुवनगर, नाशिक अशी सांगितली असुन त्यांना गुन्हयाबाबत विचारपुस केली असता
त्यांनी गुन्हयाची कबुली दिली असुन गुन्हयात वापरलेली महिन्द्रा एक्स यु व्हि गाडी क्रमांक एम.एच १५ – जी.एक्स-८७२१ ही गाडी जप्त करण्यात आलेली आहे. आरोपींना पुढील कारवाईकामी सरकारवाडा पोलिस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक,पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव,सहा पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा, संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १ चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर,
पोउनि चेतन श्रीवंत, श्रेणी पोउनि रविंद्र बागुल, पोहवा प्रविण वाघमारे, संदिप भांड, प्रदिप म्हसदे, विशाल काठे, प्रशांत मरकड, नाझीमखान पठाण, शरद सोनवणे, धनंजय शिंदे, रमेश कोळी, नापोशि मिलींद सिंग परदेशी, विशाल देवरे, पोशि मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, चालक समाधान पवार यांनी केली


